• Download App
    काँग्रेसची निवडणूक प्रचाराला सुरुवात, लखीमपूर घटनेवर प्रियांका गांधी म्हणाल्या, जोपर्यंत गृह राज्यमंत्री राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही लढत राहू!Priyanka gandhi on Lakhimpur incident said – we will keep fighting till the resignation of the Minister of State for Home

    काँग्रेसची निवडणूक प्रचाराला सुरुवात, लखीमपूर घटनेवर प्रियांका गांधी म्हणाल्या, जोपर्यंत गृह राज्यमंत्री राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही लढत राहू!

     

    यूपी काँग्रेसने 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून औपचारिकरीत्या आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. प्रियांका गांधींनी प्रथम वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि दुर्गा मंदिरात पूजा केली. यानंतर एका सभेला संबोधित केले.Priyanka gandhi on Lakhimpur incident said – we will keep fighting till the resignation of the Minister of State for Home


    प्रतिनिधी

    लखनऊ : यूपी काँग्रेसने 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून औपचारिकरीत्या आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. प्रियांका गांधींनी प्रथम वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि दुर्गा मंदिरात पूजा केली. यानंतर एका सभेला संबोधित केले. या सभेचे नाव आधी ‘प्रतिज्ञा रॅली’ असे होते, आता त्याचे ‘किसान न्याय रॅली’ असे नामकरण करण्यात आले आहे. प्रियंका गांधींनी रॅलीत आपल्या भाषणाची सुरुवात देवी दुर्गाच्या श्लोकाने केली. यानंतर योगी सरकारवर बोलताना त्या म्हणाल्या की, भाजप सरकारमध्ये न्यायाची आशा नाही.

    प्रियांका गांधी म्हणाल्या, येथे न्याय मागणारे लोक दाबले जातात. मग ते हाथरस, उन्नाव किंवा आता लखीमपूर खेरी असो. भाजप सरकार न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करतात, पण हे स्वातंत्र्य कोणी दिले आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य दिले आहे. ज्यांना ते भेटायलाही जात नाहीत.

    वाराणसीतील किसान न्याय रॅलीमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा म्हणाल्या की, या देशाच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने 6 शेतकऱ्यांना त्यांच्या कारखाली निर्दयपणे चिरडले आणि सर्व कुटुंबीय म्हणतात की, आम्हाला न्याय हवाय, नुकसान भरपाई नको. पण जो आपल्याला न्याय देतो तो या सरकारमध्ये दिसत नाही. येथील मुख्यमंत्री मंचावर बसलेल्या मंत्र्याचा (गृह राज्यमंत्री) बचाव करत आहेत, ज्यांच्या मुलाने असे कृत्य केले आहे. जे पंतप्रधान लखनऊला येऊ शकले, पण त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी दोन तासांच्या अंतरावर लखीमपूरला का जाऊ शकले नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

    प्रियांका गांधी म्हणाल्या की, जोपर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लढतच राहू. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्या म्हणाल्या, जर तुम्ही जागरूक होणार नाही, जर तुम्ही त्यांच्या राजकारणात अडकलात तर तुम्ही ना स्वतःला वाचवू शकाल ना देशाला. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही या देशाचा आत्मा आहात. तुम्ही सर्व नेत्यांना स्टेजवर बसवले आहे. जे तुम्हाला आंदोलक म्हणतात, तुम्हाला दहशतवादी म्हणतात, त्यांना न्याय देण्यास भाग पाडतात. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते कुणाला घाबरत नाहीत. आम्हाला तुरुंगात टाका, आम्हाला ठार करा, काहीही करा, पण आम्ही लढत राहू, आम्ही लढत राहू, जोपर्यंत गृह राज्यमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही हलणार नाही.”

    Priyanka gandhi on Lakhimpur incident said – we will keep fighting till the resignation of the Minister of State for Home

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य