वृत्तसंस्था
रायबरेली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशाच्या प्रचार मोहिमेवर अनेक दिवसांपासून असल्या तरी त्या आज बऱ्याच दिवसांनी रायबरेलीत पोहोचल्या.priyanka gandhi in raibareli – targets yogi adityanath and akhilesh yadav
रायबरेलीत मतदारांशी त्यांनी संवाद साधला. अनेक गल्ली मोहल्ल्यांमध्ये जाऊन काँग्रेसचा प्रचार केला. त्यानंतर झालेल्या प्रचार सभेत त्यांनी भाषण केले. त्या म्हणाल्या, की सध्या उत्तर प्रदेशात गर्मी, चर्बी ही खालच्या स्तराची भाषा ऐकू येते. पण काँग्रेसला ना कोणाची गर्मी काढायची आहे, ना कोणाची चर्बी. काँग्रेसला फक्त भर्ती करायची आहे म्हणजे उत्तर प्रदेशातील तरूण – तरूणींना रोजगार – उद्योग द्यायचा आहे. त्यांच्या हाताला काम द्यायचे आहे. त्यांच्या गुणवत्तेला न्याय द्यायचा आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री – समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या जोरदार राजकीय घमासानात अनेकदा या दोन्ही नेत्यांनी गर्मी, चर्बी शब्दांचा वापर केला आहे. बाबा मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांना चर्बी आली आहे, ती चर्बी आम्ही १० मार्चनंतर उतरवू, अशी धमकीभरली भाषा अखिलेश यादवांनी वापरली होती, तर समाजवादी पक्षाच्या गुंड माफियांची उरलेली गर्मी आम्ही १० मार्चनंतर उतरवू, अशी भाषा योगी आदित्यनाथ यांनी वापरली आहे.
या पार्श्वभूमीवर आम्हाला कोणाची गर्मी किंवा चर्बी उतरवायची नाही, तर उत्तर प्रदेशातल्या तरुण – तरुणींसाठी भर्ती करायची आहे, असे प्रत्युत्तर प्रियांका गांधी यांनी दिले आहे.
priyanka gandhi in raibareli – targets yogi adityanath and akhilesh yadav
महत्त्वाच्या बातम्या
- Prime Minister Narendra Modi ! पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर
- औरंगाबादमध्ये जयंतीनिमित्त उभारला शिवरायांचा ५२ फुटी भव्य पुतळा
- हिंदुस्थान हे तुमचेही घर!!; अफगाण हिंदू – शीख समुदायाला पंतप्रधान मोदींचे आश्वासन!!; 7 लोक कल्याण मार्गावर केले स्वागत!!