विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ता. २२ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी ज्या खुर्चीवर बसले आहेत, ती जनतेची संपत्ती आहे. तुमच्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना भीती दाखविण्यासाठी आणि धमकावण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा आहे.Priyanaka targets Yogi Adityanath
हीच सत्ता एके दिवशी जनता तुमच्याकडून काढून घेऊ शकते हे योगींनी विसरू नये अशा घणाघाती टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांक गांधी यांनी केली आहे.बुधवारी योगींनी ट्विट करून गैरकृत्य करणाऱ्यांना इशारा दिला होता.
राज्यातील युवकांनी कुणाच्याही प्रभावाखाली येऊन भरकटू नये, असे त्यांनी म्हटले होते. त्यांचे ट्विट टॅग करीत प्रियांका यांनी म्हटले आहे की, या देशात विरोधासाठी आवाज उठविणे, निदर्शने करणे आणि मागण्यांसाठी आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार आहे.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणुका होत असून त्यामउळे आतापासूनच राज्यातील राजकारण तापू लागले आहे. प्रत्येक पक्षाचा नेता राजकीय विधाने करून चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
Priyanaka targets Yogi Adityanath
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ
- फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट
- Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट
- गोव्यातही 300 युनिट मोफत वीज देणार केजरीवाल, सत्ता आल्यास जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन