• Download App
    उत्तर प्रदेशात तुरुंगातच थरार, बाहुबली मुख्तार अन्सारी याच्या गॅगमधील दोन कुख्यात गुंडाची हत्या Prison tremors in Uttar Pradesh, Two notorious goons in Bahubali Mukhtar Ansari's gang killed in Uttar Pradesh jail

    उत्तर प्रदेशात तुरुंगातच थरार, बाहुबली मुख्तार अन्सारी याच्या गॅगमधील दोन कुख्यात गुंडाची हत्या

    उत्तर प्रदेशातील रगौली जेलमध्येच गॅँगवॉरमध्ये दोघांची हत्या करण्यात आली. हे दोघेही बहुजन समाज पक्षाचा बाहुबली आमदार आणि कुख्यात गुन्हेगार मुख्तार अन्सारी याच्या टोळीतील आहेत. यानंतर गोळीबार करणाºया गुंडाचा पोलीस एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. Prison tremors in Uttar Pradesh, Two notorious goons in Bahubali Mukhtar Ansari’s gang killed in Uttar Pradesh jail


    प्रतिनिधी

    लखनौ : उत्तर प्रदेशातील रगौली जेलमध्येच गॅँगवॉरमध्ये दोघांची हत्या करण्यात आली. हे दोघेही बहुजन समाज पक्षाचा बाहुबली आमदार आणि कुख्यात गुन्हेगार मुख्तार अन्सारी याच्या टोळीतील आहेत. यानंतर गोळीबार करणाऱ्या गुंडाचा पोलीस एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला.

    शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास चित्रकूट जिल्हा कारागृहात दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली. यात गँगस्टर अंशुल याने शामली येथील कुख्यात गुन्हेगार मुकीम काला व मेराजुद्दीन उर्फ मेराज अली याची गोळ्या घालून हत्या केली.



    जेलमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अंशुलवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने काही कैद्यांना बंधक बनवून ठेवले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाºयांनी केलेल्या कारवाईत अंशुल याचाही खात्मा करण्यात आला. ठार झालेले तिघेही कुख्यात गँगस्टर असून, त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

    पश्चिमी उत्तर प्रदेशात कैरानाच्या लोकांच्या मुकीम टोळीने यासाठी सुपारी दिल्याचे बोलले जात आहे. मेराजुद्दीन हा मऊ जिल्ह्यातील बाहुबली आमदार मुख्तार अन्सारी याचा नजीकचा आहे. अंशुल हा सुपारी घेऊन हत्या करणारा गुन्हेगार होता. त्याच्याविरोधातही अनेक गुन्हे नोंदले गेलेले आहेत. अली याला मागील २० मार्च रोजी वाराणशीच्या जिल्हा कारागृहातून चित्रकूटमध्ये आणण्यात आला. मुकीम याला सात मे रोजी सहारनपूर जिल्हा कारागृहातून येथे आणण्यात आले होते.

    Prison tremors in Uttar Pradesh, Two notorious goons in Bahubali Mukhtar Ansari’s gang killed in Uttar Pradesh jail

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र