- अपघातातील जखमींच्या मदतीसाठी हजारो रक्तदात्यांची विविध रुग्णालयांमध्ये गर्दी
- मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर!!; रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री घटनास्थळावर
वृत्तसंस्था
बालासोर : ओडिशात आतापर्यंतच्या सर्वांत भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासूरमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन नेमकी भीषण परिस्थिती जाणून घेतली. मदत आणि बचाव कार्यासंदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान होते. prime Minister’s visit to the site in Balasore
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या 288 झाली असून सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य युध्दपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बालासोर मध्ये येऊन त्याचा आढावा घेत आहेत. मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
सरकारी पातळीवर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असताना सर्वसामान्यांनी देखील आपला मदतीचा खारीचा वाटा उचलायला सुरुवात केली आहे. ओडिशातल्या अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे. रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली असली तरी जखमींची संख्या त्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे जखमींवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज आहे. ही गरज ओळखूनच अनेक संस्था पुढे येऊन तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहेत. तरुणांनीही त्याला प्रतिसाद देत अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदानासाठी गर्दी केली आहे.
केंद्र सरकार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा या तिन्ही राज्य सरकारांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आपापल्या आपत्कालीन निधीतून मोठी मदतही जाहीर केली आहे.
ओडिशातील बालासोर येथे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आणि विरुद्ध रुळावर पडले. त्यामुळे यशवंतपूरहून हावडाकडे जाणाऱ्या आणखी एका रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला.
त्यातील तीन ते चार डबे रुळावरुन घसरले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री म्हणाले की, ‘अपघात दुर्दैवी होता, आणि त्यांच्या मंत्रालयाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच बचावकार्य सुरू झाले.’ एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि अग्निशमन विभागाच्या पथकांना बचावासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले.
prime Minister’s visit to the site in Balasore
महत्वाच्या बातम्या
- सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची 5 गॅरंटींना मंजुरी, 11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबवणार; पाचव्यासाठी मागवले अर्ज
- PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी US संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार
- ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली, भीषण अपघातात अनेक जखमी
- आळशी आणि नाकर्ते; शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावले