वृत्तसंस्था
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना अहमदाबाद येथील मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. Prime Minister Narendra Modi’s mother Hiraben (100) admitted to hospital
पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना २७ डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या यू. एन. मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात नेण्यात आले होते. गेल्या १८ जून रोजी हीराबेन मोदी यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती जी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये मोदींनी त्यांच्या आईची भेट घेतली होती.
दरम्यान, आई आणि मुलाचे प्रेम फार अनमोल असते. मोदीजी या संकट काळात मी आपल्या पाठीशी आहे. आपल्या आई लवकर बऱ्या होवोत, अशी प्रार्थना करतो, अशा आशयाचे ट्विट खासदार राहुल गांधी यांनी केले आहे.
कालच पंतप्रधान मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी हे म्हैसूरला गेले असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघात प्रल्हाद मोदी आणि त्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत. त्यांच्यावर म्हैसूर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Prime Minister Narendra Modi’s mother Hiraben (100) admitted to hospital
महत्वाच्या बातम्या
- MPSC : आरोग्य विभागात भरती; कोणत्या पदांसाठी किती जागा?
- 31 डिसेंबरला पश्चिम रेल्वेच्या जादा गाड्या; रात्री लोकलच्या 8 विशेष फेऱ्या, पहा वेळापत्रक
- देशमुख – मलिक / सत्तार – राठोड : तुम्ही हार्ड विकेट काढल्या; आम्ही निदान सॉफ्ट विकेट तर काढू; महाविकास आघाडीचे टार्गेट
- ITI विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ; ४० रुपयांऐवजी ५०० रुपये देणार