वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे भव्य समारंभात उद्घाटन केले. उद्या पुन्हा पंतप्रधान मोदी हे वाराणसी येथे जात असून ते वाराणसीतल्या सुमारे 22 प्रकल्पांचे शिलान्यास आणि उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांची किंमत 870 कोटी रुपयांच्या घरात आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्या बनास डेअरी प्रकल्पाच शिलान्यास होणार आहे. Prime Minister Narendra Modi will return to Varanasi tomorrow
काशी विश्वनाथ कॉरिडाॅर उद्घाटनाच्या निमित्ताने महिनाभर वाराणसीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या परिषदांची रेलचेल आहे. यामध्ये हा भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक तसेच देशातल्या सर्व महापौरांची बैठक काशीमध्ये प्रथमच घेण्यात आली आहे. या दोन्ही बैठकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले आहे. यानंतर महत्त्वाची बैठक म्हणजे विविध देशांच्या राजपुतांची आणि पर्यटन संस्कृती मंत्र्यांची परिषद काशीमध्ये होणार आहे.
उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वाराणसीतल्या विविध 22 विकास प्रकल्पांचा शिलान्यास आणि उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.