• Download App
    आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे केदारनाथ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण । Prime Minister Narendra Modi unveils the statue of Shri Adi Shankaracharya at Kedarnath in Uttarakhand

    आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे केदारनाथ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण

    वृत्तसंस्था

    केदारनाथ : सनातन वैदिक धर्माची पताका संपूर्ण आर्यावर्तात फडकवणारे आद्य शंकराचार्य यांच्या मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारधाम येथे करण्यात आले. आज कार्तिक शुद्ध पौर्णिमा अर्थात दिपावली पाडवा. या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदींनी आद्य शंकराचार्य यांच्या मूर्तीचे अनावरण त्यांच्या समाधीस्थानी केले. यावेळी मोदींनी नव्‍या केदारनाथ धामचे देखील उद्घाटन केले. Prime Minister Narendra Modi unveils the statue of Shri Adi Shankaracharya at Kedarnath in Uttarakhand

    केदारनाथ धाम येथे आद्य शंकराचार्यांनी समाधी घेतल्याचे मानले जाते. तत्पूर्वी शंकराचार्यांनी चार मठांची स्थापना करून सनातन वैदिक धर्माची पुनर्स्थापना संपूर्ण भारत वर्षात केली होती. आपल्या जीवनाच्या अखेरीस ते केदारनाथ येथे पोहोचले आणि तेथे मठस्थापना करून यांनी वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी समाधी घेतली.



    हे समाधीस्थान भाविकांसाठी मोठे श्रद्धास्थान बनले आहे. परंतु तेथे आद्य शंकराचार्यांची मूर्ती नव्हती. आता ही मूर्ती तेथे स्थापन केल्याने सनातन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करणाऱ्या शंकराचार्यांचे दर्शन भाविकांना होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी मूर्तीचे अनावरण केल्यानंतर त्या स्थानी त्यांनी थोडावेळ ध्यानधारणा केली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी बाबा केदारनाथ दर्शन घेऊन रुद्राभिषेक करून महाआरती केली. त्यानंतर मोदींनी सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या विविध वास्तूंचे उद्घाटन केले.

    Prime Minister Narendra Modi unveils the statue of Shri Adi Shankaracharya at Kedarnath in Uttarakhand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!