• Download App
    तालिबानचा संभाव्य धोका; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली CCS ची महत्त्वाची बैठक; कोणता निर्णय घेतला?? Prime Minister Narendra Modi chairs the meeting of Cabinet Committee on Security (CCS), the meeting is currently underway.

    तालिबानचा संभाव्य धोका; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली CCS ची महत्त्वाची बैठक; कोणता निर्णय घेतला??

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – अफगाणिस्तानातल्या अत्यंत असुरक्षित वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक मंत्री समितीची बैठक घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बैठकीला उपस्थित होते. Prime Minister Narendra Modi chairs the meeting of Cabinet Committee on Security (CCS), the meeting is currently underway.

    अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची सविस्तर चर्चा या बैठकीत केल्याचे सांगण्यात आले. भारतीयांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य राहील. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे अधोरेखित करण्यात आले. तालिबानी राजवटीकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबतही विचार विनिमय करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, संरक्षण सचिव, गृह सचिव, अर्थ सचिव हे देखील बैठकीस उपस्थित होते.

    अफगाणिस्तामधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी हे सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. ते काल रात्री उशिरापर्यंत स्थितीची माहिती घेत होते. काबूलमधून हवाई दलाच्या विमानांनी उड्डाण घेतल्याबाबत त्यांना अपडेट देण्यात आले होते. जे नागरिक जामनगरमध्ये परतले त्यांच्यासाठी भोजन आणि इतर व्यवस्था करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिल होते, असे सांगण्यात आले.

    काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये अराजक स्थिती आहे. अशा स्थितीत भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्यांना घेऊन हवाई दलाच्या विमानाने उड्डाण केले होते. अफगाणिस्तानमधील भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन यांनी अफगाणिस्तामधील स्थितीची माहिती दिली. काबुलमध्ये अतिशय भयंकर परिस्थिती आहे. ही परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे आणि नाजूक झाली आहे. तिथे अडकलेल्या नागरिकांना प्रवासी वाहतूक सुरू झाल्यावर परत आणले जाईल. सुरक्षित आल्याने आनंदी आहे, असे टंडन म्हणाले.

    भारतीय दूतावास तालिबान्यांच्या सातत्याने टार्गेटवर आहे. तिथे एवढे असुरक्षित वातावरण आहे की केव्हा, कोठून, कसा हल्ला होईल सांगता येत नाही, अशा स्थितीत आम्ही कर्तव्य बजावत भारतीय अधिकारी कर्मचारी आणि अन्य नागरिकांचे संरक्षण करीत होतो, असे अफगाणिस्तानातल्या तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांचे प्रमुख कमांडर रविकांत गौतम यांनी भारतात परतल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

    कमांडर गौतम म्हणाले की, अफगाणिस्तानातील अवस्था दिवसेंदिवस खराब होत राहणार आहे. अशा स्थितीत लवकरात लवकर भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करणे आणि त्यांना सुरक्षित भारतात आणणे हे आमचे प्रथम कर्तव्य होते. ते आम्ही उत्तम पार पाडल्याचे समाधान आहे.

    Prime Minister Narendra Modi chairs the meeting of Cabinet Committee on Security (CCS), the meeting is currently underway.

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक