विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील अल्पसंख्यांकांच्या जीवनमान उंचवावे यासाठी अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी तयार केलेल्या पंतप्रधानांच्या पंधरा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.Prime Minister Modi’s 15 point program to uplift the living standards of minorities
केंद्र सरकारची विविध मंत्रालये ख्रिश्चन, शीख, जैन आणि मुस्लीम, बौद्ध आणि पारशी या देशातील नोंदणीकृत अल्पसंख्यांकांसाठी हा पंधरा कलमी कार्यक्रम राबवणार आहेत. या योजनांद्वारे अल्पसंख्यांकांना शिक्षण, आर्थिक विकास यामध्ये त्यांचा योग्य वाटा निश्चित करणे. तसेच जातीय असमानता आणि हिंसाचार रोखणे आणि नियंत्रण करणं हे मोदी सरकारचं उद्दीष्ट आहे.
मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप योजना, बेगम हजरत महल राष्ट्रीय स्कॉलरशीप, नया सवेरा – मोफत शिक्षण योजना या शैक्षणिक विकासासाठी योजना आहेत. आर्थिक विकास आणि कौशल्य विकास योजनांमध्ये कमवा आणि शिका योजना, गरीब नवाज रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास निधी महामंडळ कर्ज योजना,
बँकांकडून प्राधान्य क्षेत्रातील कर्ज देणे (वित्तीय सेवा विभाग), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार), राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (ग्रामीण विकास मंत्रालय), दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना (ग्रामीण विकास मंत्रालय), प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यांचा समावेश आहे.
Prime Minister Modi’s 15 point program to uplift the living standards of minorities
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सूर्यदत्त’तर्फे नितीन गडकरी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
- औंध ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम निविदेव्दारे ; राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी मानले आयुक्तांचे आभार
- “भावी मुख्यमंत्री” बोर्ड पाहताच एकनाथ शिंदे भडकले… की… बिचकले??… पुढे काय केले??
- मेक इन इंडियाचा त्रास काय आणि कोणाला होतोय??; पंतप्रधान मोदींचा संसदेत खोचक सवाल!!