• Download App
    Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे Prime Minister Modi will address the nation from the Red Fort today the attention of crores of citizens will be on the speech

    Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची आणि ध्वजारोहण करण्याची ही दहावी वेळ आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  देश स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न आहे. आज स्वातंत्र्यदिनी देशभरात ध्वजारोहण होणार आहे. तर पंतप्रधान परंपरेनुसार लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार आहेत. ही दहावी वेळ असेल जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील आणि ध्वजारोहण करतील. Prime Minister Modi will address the nation from the Red Fort today the attention of crores of citizens will be on the speech

    याशिवाय पंतप्रधान मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप करतील. हा उपक्रम पंतप्रधान मोदींनी मार्च २०२१ मध्ये अहमदाबाद साबरमती आश्रमातून सुरू केला होता आणि याला पुन्हा एकदा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात समाविष्ट केले जाईल.

    या दरम्यान पंतप्रधान मोदी संपूर्ण देशाला संबोधित करतील आणि हा संपूर्ण कार्यक्रम सकाळी ७ वाजल्यापासूनच सुरू होईल. सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनेलवर आणि त्यासोबतच त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्रोफाइलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. वृत्तवाहिन्यांबद्दल बोलायचे झाले तर दूरदर्शन आणि इतर वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाईल. लोक मोदींच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

    दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्त इतर देशांतील अनेक पाहुणे आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबतीला देशभरातून विविध ठिकाणाहून सुमारे १८०० जणांना आमंत्रित करण्यात आले आहे. शासनाच्या लोकसहभागाच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम घेण्यात आला आहे. लाल किल्ला परिसरावर सुरक्षा रक्षकांची आणि प्रशासनाची करडी नजर आहे.

    Prime Minister Modi will address the nation from the Red Fort today the attention of crores of citizens will be on the speech

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा