नवीन संसद भवनात एका तासापेक्षा जास्त वेळ घालवला आणि विविध कामांची पाहणी केली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आज (३० मार्च) संध्याकाळी उशीरा अचानक नवीन संसद भवनाला भेट दिली. जवळपास तासाभराहून अधिक वेळ घालवून त्यांनी विविध कामांची पाहणी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहात येणाऱ्या सुविधांचे त्यांनी निरीक्षण केले. Prime Minister Modi surprise visit to New Parliament Building talks with construction workers
पंतप्रधानांनी बांधकाम कामगारांशीही संवाद साधला. पंतप्रधानांसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती. कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते, कॅबिनेट मंत्री आणि विविध देशांचे राजदूत उपस्थित होते. नवीन संसदेचे क्षेत्रफळ ६४ हजार ५०० चौरस मीटर असेल.
संसदेच्या जुन्या गोलाकार इमारतीसमोरच नव्या संसदेची त्रिकोणी आकारातील इमारत आहे. नव्या इमारतीमध्ये सेट्रंल हॉलची क्षमता एक हजार लोक बसतील, अशी करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठकीसाठी हा उत्तम पर्याय असेल. नोव्हेंबर २०२२ मध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट पूर्ण होणार होता. मात्र काही कारणांमुळे त्याचे काम नियोजित वेळेच्या पुढे गेले.
Prime Minister Modi surprise visit to New Parliament Building talks with construction workers
महत्वाच्या बातम्या
- Video : अमृतपाल सिंगने जारी केला व्हिडिओ , म्हणाला – ‘मला अटक करण्याचा हेतू असता तर…’
- राहुल गांधीचे लोकसभा सदस्यत्व रद्द प्रकरणावर नितीश कुमारांचे मौन; प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा, म्हणाले
- iCloud : मोदी पायउतार झाल्यावर भाजपचे भ्रष्ट नेते तुरुंगात, केजरीवालांची दिल्ली विधानसभेत आगपाखड; पण नेमके “रहस्य” काय??
- महाविकास आघाडीच्या 11 सभा विरुद्ध 288 सावरकर गौरव यात्रा; शहास महाकाटशह!!