• Download App
    जगत कल्याण आणि भारत वर्षाचा उत्कर्ष या संकल्पासह पंतप्रधान मोदींनी केले काशी विश्वनाथाचे पूजन!! । Prime Minister Modi pays homage to Kashi Vishwanath with the resolution of world welfare and prosperity of India year !!

    जगत कल्याण आणि भारत वर्षाचा उत्कर्ष या संकल्पासह पंतप्रधान मोदींनी केले काशी विश्वनाथाचे पूजन!!

    वृत्तसंस्था

    काशी : जगत कल्याण आणि भारत वर्षाचा उत्कर्ष या संकल्पासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशी विश्वनाथ धाम येथील काशी विश्वनाथाचे पूजन केले. मतंग मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचले आणि त्यांनी हर हर महादेव च्या गजरात पूजन केले. यावेळी मोदींच्या हस्ते काशीविश्वनाथास रुद्राभिषेक करण्यात आला. Prime Minister Modi pays homage to Kashi Vishwanath with the resolution of world welfare and prosperity of India year !!

    यावेळच्या संकल्पात पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथाकडे जगात कल्याण आणि भारत वर्षाच्या उत्कर्षाचा आशीर्वाद मागितला. या पूजनानंतर पंतप्रधान मोदींनी बेलाच्या वृक्षाचे रोपण केले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगास्नान करून गंगाजल रजत कलशात घेऊन चालत काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले.

    हे गंगाजल त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथाचे लिंगावर अर्पण केले. तत्पूर्वी मंदिर परिसरात शेकडो डमरू वादकांनी डमरू वादन करत मोदींचे स्वागत केले. त्याचवेळी महिलांकडून रुद्र पठण करण्यात येत होते. रुद्राभिषेक संकल्पात जगत कल्याण आणि भारतवर्षाचा उत्कर्ष पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

    Prime Minister Modi pays homage to Kashi Vishwanath with the resolution of world welfare and prosperity of India year !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य