वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आज केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः गैरहजर होते. या बैठकीत विरोधकांनी महागाईपासून कृषी कायद्यात पर्यंत सर्व मुद्दे उपस्थित केले. सरकारच्या तर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या मुद्द्यांना उत्तरे दिली. Prime Minister Modi absent from all-party meeting; Mallikarjun Kharge suspects imposing agricultural laws under a different name
मात्र केंद्र सरकारने वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले असले तरी ते नव्या नावाने किंवा नव्या रुपात देशावर लादले जाऊ शकतात, असा संशय राज्यसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा होती. कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या एका गटाला आम्ही समजून सांगू शकलो नाही, असे ते म्हणाले आहेत. याचा अर्थच केंद्र सरकारने आज जरी तीनही कृषी कायदे मागे घेतले असले तरी ते नव्या नावाने किंवा नव्या रुपात देशावर पुन्हा लादले जाऊ शकतात, अशा शब्दांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी संशय व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्यात बरोबरच किमान मूल्य धारणा कायदा विधेयक मांडावे म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे किमान मूल्य तरी मिळाले पाहिजे, असा कायदा करावा अशी आग्रही मागणी सर्व विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीत लावून धरल्याची माहिती खर्गे यांनी दिली आहे.
Prime Minister Modi absent from all-party meeting; Mallikarjun Kharge suspects imposing agricultural laws under a different name
महत्त्वाच्या बातम्या
- कोणी आम्हाला छेडले नाही तर त्याला सोडणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- दहशतवादी संघटनांचा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने केला खात्मा
- युरियाची टंचाई संपणार, १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- मुंबईच्या नाईट लाईफची जेवढी काळजी तेवढी महिलांच्या सुरक्षेची का नाही? चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला सवाल