• Download App
    प्रशांत भूषण बेजबाबदारपणे बरळले : कोविडने मृत्यू होत नाही; पण लस घेतल्याने मृत्यूचीच अधिक शक्यता! Prashant Bhushan turned irresponsibly

    प्रशांत भूषण बेजबाबदारपणे बरळले : कोविडने मृत्यू होत नाही; पण लस घेतल्याने मृत्यूचीच अधिक शक्यता!

    • लसीने नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपुष्टात येत असल्याचेही तोडले अकलेचे तारे

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सगळे जग कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आग्रह धरत असताना सुप्रीम कोर्टातील वकील प्रशांत भूषण मात्र लसीकरणाच्या विरोधात आहेत. पण हा विरोध करण्याच्या नादात त्यांनी अकलेचे तारे तोडले असून अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोविड लस घेतल्याने मृत्यूची अधिक शक्यता आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे‌. तसेच या लसीमुळे नैसर्गिक प्रतिकार शक्ती देखील संपुष्टात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  Prashant Bhushan turned irresponsibly

    प्रशांत भूषण हे व्यवसायाने वकील आहेत, तरीदेखील त्यांनी लसींबद्दल हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या धक्कादायक टिपणीवर देशभरातून टीकेचे जबरदस्त प्रहार होत आहेत. लसींबद्दल भीती निर्माण करणाऱ्या त्यांच्या या कृतीतून वैज्ञानिक, वैद्यकीय वर्तुळातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. एवढे होऊन सुद्धा त्यांनी आपले ट्विट मागे घेतलेले नाही. त्यांच्या या बेजबाबदार ट्विटबद्दल ट्विटरनेही त्यांच्यावर ‘मिसलिडींग’ करत असल्याचे लेबल लावले आहे!

    मी लस टोचून घेतली नाही आणि लस टोचून नाही घेणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांना त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी विचारणा केल्यावर त्यांनी खुलासा केला आहे, की मी लसीकरणाच्या विरोधात नाही. पण ज्या लसींची चाचणी झालेली नाही त्यांच्या सरसकट लसीकरणाला माझा विरोध आहे.

    आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी प्रशांत भूषण यांनी एका बातमीचे कात्रण ट्विट केले आहे. एका व्यक्तीच्या पत्नीचे लसीकरणानंतर निधन झाले. त्या व्यक्तीने त्याबद्दल स्वतःलाच दोष दिल्याची ती बातमी आहे. त्याचबरोबर पत्नीच्या निधनानंतर लसीकरण केलेल्यांपैकी कोणीही विचारायला देखील आले नाही, असा रागही गुप्ता नावाच्या व्यक्तीने व्यक्त केला आहे. ही ती बातमी आहे.

    Prashant Bhushan Turned Irresponsibly

    Prashant Bhushan Turned Irresponsibly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही