• Download App
    हबीबगंज स्थानकाला वाजपेयी यांचे नाव देण्याची भाजप खासदार प्रग्यासिंह यांची मागणी |Pradnya singh Thakur demand for renaming Raiway station

    हबीबगंज स्थानकाला वाजपेयी यांचे नाव देण्याची भाजप खासदार प्रग्यासिंह यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळजवळील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलावे आणि त्यास दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजपच्या खासदार प्रग्यासिंह ठाकूर यांनी केली आहे.Pradnya singh Thakur demand for renaming Raiway station

    या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. विमानतळावर असतात तशा आधुनिक सुविधा तेथे सज्ज करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते येत्या सोमवारी या रेल्वे स्थानकाचा लोकार्पण कार्यक्रम होईल.



    या पार्श्वभूमीवर प्रग्यासिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जनजातीय गौरव दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आदरणीय पंतप्रधानांचे आगमन होणे हा भोपाळसाठी शुभशकून आहे. हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नामांतर करून वाजपेयी यांचे नाव देण्यात आल्याचे ते जाहीर करतील आणि माझी जुनी विनंती पूर्ण करतील अशी मला खात्री आहे.

    Pradnya singh Thakur demand for renaming Raiway station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार