• Download App
    मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांची न्यायालयात हजेरी|Pradnya Sing appears before court

    मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांची न्यायालयात हजेरी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आणि भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. वैद्यकीय उपचारासाठी ठाकूर मुंबईत आल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाने समन्स बजावले नसतानाही त्या खटल्यात हजर झाल्या होत्या.Pradnya Sing appears before court

    २००८ ते २०१७ पर्यंत त्या कारागृहात होत्या. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.यापूर्वी मागील वर्षी जानेवारीत त्यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. ठाकूर आणि ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींचा समावेश आहे.



    आतापर्यंत आठ साक्षीदार खटल्यात फितूर झाले आहेत. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव येथील मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहा जण ठार, तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. मोटरसायकलवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बमुळे हा स्फोट झाला,

    असा आरोप पोलिसांनी केला आहे. या मोटरसायकलची नोंदणी ठाकूर यांच्या नावे आहे. मात्र, बॉम्बस्फोट होण्याच्या खूप आधी ती एकाला विकली होती, असा बचाव ठाकूर यांनी केला आहे.

    Pradnya Sing appears before court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही

    Cotton : कापड व्यापारी 31 डिसेंबरपर्यंत टॅरिफमुक्त कापूस आयात करू शकतील; वस्त्रोद्योग क्षेत्राला 50% अमेरिकन टॅरिफपासून वाचवण्याचा निर्णय

    Justice Nagaratna : न्यायमूर्ती नागरत्ना SCच्या कॉलेजियमशी असहमत; न्यायमूर्ती विपुल पंचोलींच्या SCत नियुक्तीवर आक्षेप