वृत्तसंस्था
द्वारका : भगवान श्रीकृष्णाची नगरी द्वारकेत ज्याला बेट द्वारकाही म्हणतात, तेथे आज 80 % मुस्लिम लोकसंख्या झाली आहे. तिथल्या तब्बल 6.50 कोटी रुपयांच्या जमिनीवर कब्जा करून मशीद आणि मीनारांचे बांधकाम झाले आहे. हीच ती द्वारका नगरी आहे, जिथून आता कराची फक्त 2.00 तासांच्या अंतरावर आहे, पण पौराणिक दृष्ट्या द्वारका भगवान श्रीकृष्णाची नगरी आहे. Possession of 6.50 crore land in Lord Krishna’s island Dwarka
याच द्वारकेत श्रीकृष्णाचा मित्र सुदामा याने त्याची भेट घेतली होती आणि भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले होते. पण आज मात्र बेट द्वारकावर सुमारे 12500 लोक राहतात त्यातली 80 % लोकसंख्या मुस्लिम आहे. म्हणजेच तब्बल 9500 मुस्लिम लोकसंख्या तिथे आहे. त्यामुळेच तेथे मशिदी मिनारांचे आणि मजारींचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यासाठी तब्बल 6.50 कोटी रुपयांच्या जमिनीवर कब्जा करण्यात आला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून बेट द्वारकावर मुस्लिमांनी ठिकठिकाणी अतिक्रमण केले होते. मात्र आता ऑक्टोबर महिन्यापासून तेथे बुलडोझर चालवून अतिक्रमणे पाडली जात आहेत. आत्तापर्यंत 100 पेक्षा अधिक अतिक्रमणांवर म्हणजे 40 % अतिक्रमणांवर गुजरात सरकारने बुलडोझर चालविला आहे.
मूळ द्वारकेपासून बेट द्वारका 35 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे अनेक ठिकाणी समुद्रात भराव टाकून आणि तिथले जंगल कापून जमिनीवर अतिक्रमण करून मशिदी, मिनार आणि मजारी बांधण्यात आल्या आहेत. या बांधकामाचा अधिकृत सरकारी पातळीवर कोणताही हिशेब नाही. ही बांधकामे कोणत्या नियमानुसार केली याचा तपशील बांधकाम करणाऱ्यांकडे पण नाही. अतिक्रमण झालेल्या जमिनीची किंमत गुजरात सरकारच्या एस्टिमेट नुसार 6.50 कोटी रुपयांची आहे. येथूनच अनेक मच्छीमार समुद्रातील आंतरराष्ट्रीय सीमेवर जातात आणि परत येतात. बेट द्वारका पासून कराची बंदर 105 किलोमीटर अंतरावर आहे.
मथुरेत माकडांचा उच्छाद, बंदोबस्तासाठी महापालिकेची विशेष मोहीम, तीन दिवसांत १०० माकडे पकडली
2005 मध्ये बेट द्वारकेच्या किनाऱ्यावर 6 मशिदी असल्याची नोंद होती. परंतु 2005 ते 2022 अशा 17 वर्षांमध्ये मशिदींची संख्या 78 वर पोहोचली. सॅटॅलाइट इमेज मधून ही बाब स्पष्ट होते. प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली. मात्र बेट द्वारकावर पत्रकारांना जायला मनाई करण्यात आली आहे. एकतर गुजरात विधानसभेची सध्या निवडणूक असल्याने तेथे आचारसंहिता लागू आहे. त्याचबरोबर अतिक्रमणावरील बुलडोजर कारवाईमुळे बेट द्वारकाचा परिसर अतिसंवेदनशील म्हणूनही जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर सावधानता बाळगण्याच्या दृष्टीने तेथे पत्रकारांना जाण्यास पोलीस आणि प्रशासनाच्या परवानगीची गरज भासत असल्याचे दै. भास्करच्या रिपोर्टिंग मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तानात रोटी बेटी व्यवहार
बेट द्वारकाची लोकसंख्या सुमारे 12500 असली आणि त्यातली मुस्लिमांची संख्या 9500 असली तरी त्यांचे रोटी बेटीचे व्यवहार पाकिस्तानशी देखील आहेत. पाकिस्तानातील कराची आणि आसपासच्या परिसरातून अनेक मुलींचा विवाह भेट द्वारका मधील मुलांशी झाला आहे, तर बेट द्वारका मधील अनेक मुलींचा विवाह पाकिस्तानी मुलांशी करून देण्यात आला आहे. हा सर्व व्यवहार छुप्या पद्धतीनेच झाल्याची पोलीस प्रशासनाची माहिती आहे. या दृष्टीने देखील अतिसंवेदनशील भाग म्हणून सध्या बेट द्वारका कडे पाहण्यात येते. बेट द्वारकातील श्रीकृष्ण मंदिर परिसराकडे जाण्यासाठी जेटीची सोय आहे, तसेच स्थानिक बोटीही आहेत. परंतु, आता या सर्वांवर पोलीस प्रशासनाची
कडक नजर आहे.
लोकसंख्येत घातक बदल
1945 मध्ये येथे गायकवाडी होती. म्हणजे बडोदा संस्थानचे राज्य होते. बडोद्याचे शासक गायकवाड यांनी मुस्लिमांना येथे काही जागा उपलब्ध करून दिली होती. 1960 च्या जनगणनेनुसार बेट द्वारकावर 600 मुस्लिम आणि 2786 हिंदू मतदार होते. लोकसंख्येच्या पातळीनुसार आणि काळानुसार इथली लोकसंख्ये लोकसंख्या हिंदूंची 6000, तर मुस्लिमांची 1200 असायला हवी होती. प्रत्यक्षात सध्या म्हणजे 2022 मध्ये बेट द्वारकाची लोकसंख्या 12500 आहे आणि त्यातली 9500 लोकसंख्या मुस्लिमांची आहे. इथले हिंदू बेट द्वारका मधून स्थलांतरित होऊन मूळ द्वारकेत गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अधिकृतरित्या बेट द्वारकावर 960 हिंदू तर 6040 मुस्लिम लोकसंख्या आहे.
500 कोटींची ड्रग्स जप्त
बेट द्वारका परिसरात 2019 मध्ये तब्बल 500 कोटी रुपयांची 236 किलो ड्रग्स राष्ट्रीय तपास संस्था एनआयएनने पकडली होती. यामध्ये तस्करीच्या गुन्ह्यामध्ये 6 पाकिस्तानी नागरिक सामील होते. हे सर्व गुन्हेगार पाकिस्तानी जहाज अल मदिनामधून भारतीय हद्दीत घुसले होते. त्यावेळी सागरी सुरक्षा दलाच्या जवानांनी जहाजाला घेरताच या गुन्हेगारांनी आपल्या जवळच्या सॅटेलाईट फोन आणि ड्रग्सची काही पाकीटे समुद्रात फेकली होती. परंतु तरी देखील जहाजावर ट्रकची 211 पाकिटे पकडली होती. यातील मुख्य आरोपी रमजान आणि त्याचा मुलगा जावेद हे दोघेही पाकिस्तानी जेलमध्ये सध्या बंद असल्याचे सांगण्यात येते. या रमजाननेच बेट द्वारकावर तब्बल 5000 वर्ग फूट जमिनीवर बेकायदा कब्जा केला होता आणि तेथूनच तो तस्करी करत होता, अशी माहिती भास्करच्या रिपोर्टिंग मध्ये देण्यात आली आहे.