वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हिंदू असो की मुसलमान देशात लोकसंख्या कमी करण्यासाठी “एक कुटुंब, एक मूल” हाच नियम हवा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. Population can be controlled with the ‘one family, one child’ policy. Our party believes that there should be ‘hum do, humara ek’ policy to control population
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सध्या देशभर समान नागरी कायदा या विषयी चर्चा आहे. देशाचा विकास साधायचा असेल तर लोकसंख्या कमी केली पाहिजे. मग ती हिंदू असो किंवा मुसलमान लोकसंख्या असो, ती कमी करण्यासाठी देशात आता “हम दो, हमारे दो” हा नियम बाजूला सारून “हम दो_ हमारा एक” हा नियम लागू केला पाहिजे असे माझ्या रिपब्लिकन पक्षाचे मत आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले लोकसंख्येचा भार विकासाला मारक ठरतो याची आठवणही त्यांनी करून दिली.
रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी सध्या तरी भाजपचा मित्रपक्ष असली तरी तिची राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे. या स्वतंत्र विचारसरणीतून देखील रामदास आठवले यांनी लोकसंख्या नियंत्रणाचा धर्मापलीकडे जाऊन विषय मांडल्याने त्यावर आता सोशल मिडीयावर चर्चा सुरू झाली आहे.