• Download App
    पोप-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे भारतातील ख्रिश्चन समुदायाकडनू उत्साहात स्वागत|Pope-Prime Minister Narendra Modi's visit is warmly welcomed by the Christian community in India

    पोप-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे भारतातील ख्रिश्चन समुदायाकडनू उत्साहात स्वागत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हॅटिकन सिटी राज्याचे सार्वभौम प्रमुख पोप फ्रान्सिस यांच्या भेटीचे भारतातील ख्रिश्चन समुदायाने स्वागत केले आहे. भारत आणि व्हॅटिकन तसेच कॅथोलिक चर्च यांच्यातील संबंध यामुळे आणखी चांगले होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.पोप फ्रान्सिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात ३० मिनिटे भेट झाली. पोप यांची भेट घेणारे नरेंद्र मोदी भारताचे पाचवे पंतप्रधान बनतील.Pope-Prime Minister Narendra Modi’s visit is warmly welcomed by the Christian community in India

    सरकारने अधिकृतपणे या भेटीची घोषणा करण्यापूर्वीच, केरळ कॅथोलिक बिशप कॉन्फरन्सचे अध्यक्ष कार्डिनल जॉर्ज अ‍ॅलेन्चेरी यांनी एक निवेदन जारी केले की आपला देश आणि व्हॅटिकन आणि कॅथोलिक चर्च यांच्यातील संबंधांमध्ये अधिक ऊर्जा आणि उबदारपणा वाढेल.



    देशाच्या अनेक भागांमध्ये ख्रिश्चन समुदाय आणि त्याच्या संस्थांवर छळ आणि हल्ले होत असल्याच्या तक्रारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची भेट महत्वाची मानली जात आहे. कारण असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन आॅफ सिव्हिल राइट्स, युनायटेड अगेन्स्ट हेट आणि युनायटेड ख्रिश्चन फोरमच्या एका तथ्य शोध पथकाने अलीकडेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडला भेट दिल्यानंतर अहवाल सादर केला आहे,

    ज्यामध्ये या राज्यांमध्ये ख्रिश्चन आणि चर्च यांच्यावर हल्ले होत आहेत. राजकीयदृष्ट्याही भेट महत्त्वाची मानली जात आहे. कारण गोव्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. याठिकाणी ख्रिश्चन समुदायाची मते निर्णायक आहे. गोव्यातील भाजपसाठी ख्रिश्चन समुदायाची मते त्यामुळे महत्त्वपूर्ण आहेत.

    रोमन कॅथोलिक चर्चचा केरळमध्येही प्रभाव आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम हे राज्यात सुमारे निम्याहून अधिक आहे. याठिकाणी भाजपला राजकीय ताकद म्हणून पुढे येण्यासाठी ख्रिश्चन समुदायाचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा आहे. ख्रिश्चन हा भारतातील तिसरा मोठा धार्मिक समुदाय आहे. 2011 च्या जनगणनेनुसार देशाच्या लोकसंख्येत हिंदू आणि मुस्लिम यांच्यानंतर ख्रिश्चनांचे प्रमाण २.३ टक्के आहे.

    Pope-Prime Minister Narendra Modi’s visit is warmly welcomed by the Christian community in India

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट