• Download App
    त्रिचूरच्या कृष्ण मंदिरात रोबोटिक हत्तीकडून पूजा अर्चा!!; पेटा आणि अभिनेत्री पार्वती थिरूवोथूने दिला भेटPooja by Robotic Elephant at Trichur's Krishna Temple!!; PETA and actress Parvathy Thiruvothu gave a gift

    त्रिचूरच्या कृष्ण मंदिरात रोबोटिक हत्तीकडून पूजा अर्चा!!; पेटा आणि अभिनेत्री पार्वती थिरूवोथूने दिला भेट

    प्रतिनिधी

    त्रिचूर : नुसतेच प्राणी प्रेम आहे असे म्हणून चालत नाही, तर ते आपल्या ॲक्शन मधून सुद्धा दिसून येणे गरजेचे आहे. आजच्या या काळात बऱ्याच प्राण्यांच्या जाती हळूहळू नष्ट होताना दिसत आहेत. त्याचाच विचार करून प्राण्यांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी केरळ मधील त्रिचूर जिल्ह्यातील इरिंजादापल्ली श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक कार्यासाठी रोबोटिक हत्तीचा उपयोग करण्याचे ठरविले आहे. प्राणिप्रेमी संस्था पेटा आणि अभिनेत्री पार्वती थिरुवोथु यांनी 5 लाख रुपये किंमत असलेला हा रोबोटिक हत्ती श्रीकृष्ण मंदिराला भेट दिला आहे. Pooja by Robotic Elephant at Trichur’s Krishna Temple!!; PETA and actress Parvathy Thiruvothu gave a gift

    800 किलो वजन असलेल्या या हत्तीची उंची 11 फूट आहे.लोखंडापासून तयार झालेल्या या हत्तीवर रबरचे कव्हर स्किन म्हणून बसविण्यात आले आहे. रिमोट कंट्रोल वाला हत्ती विजेवर चालणारा आहे. त्याचे कान, पाय, सोंड हे सर्व विजेवर चालते. एवढेच नाही तर सजीव हत्तीवर जसे चार लोक बसू शकतात, म तसेच या हत्तीवर देखील चार लोक बसविण्याची क्षमता या हत्तीत आहे. आणि या रिमोट कंट्रोल रोबोटिक हत्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा अगदी खरा असल्यासारखाच भासतो.

    इरिंजादापल्ली श्रीकृष्ण मंदिराचे पुजारी राजकुमार नंबूदरी म्हणतात, की हत्ती अगदी खरा आहे असेच वाटते. हत्ती हा खूप मोठा प्राणी आहे. त्याचा सांभाळ करणे तितके सोपे नाही. त्यामुळे इतर ठिकाणी त्याला भाल्याने मारले जाते. तसेच साखळदंडाने बांधून ठेवले जाते. कधी कधी धार्मिक कार्यासाठी या हत्तींना वेगवेगळ्या दूरच्या राज्यात न्यावे लागते. त्यामुळे या हत्तींच्या पायांना देखील जखमा होतात.

    या अशा अत्याचारांपेक्षा हत्तींना जंगलात सोडून देऊन या रोबोटिक हत्तीचा वापर धार्मिक कार्यांसाठी केला पाहिजे. श्रीकृष्ण मंदिरात या हत्तीचा उपयोग होत आहे. तसेच इतर मंदिरात देखील या रोबोटिक हत्तीचा उपयोग करणे करून घेतील अशी आशा वाटते.

    पेटा आणि अभिनेत्री पार्वती थिरुवोथु यांचा हत्तींना होणाऱ्या त्रास कमी करून त्यांना परत जंगलात पाठविणे हा मुख्य हेतू आहे. धार्मिक कार्यात कोणताही अडथळा न आणता प्राणी जीवन वाचविणे यासाठी पेटाने केलेला हा प्रयोग नक्कीच यशस्वी ठरला आहे.

    Pooja by Robotic Elephant at Trichur’s Krishna Temple!!; PETA and actress Parvathy Thiruvothu gave a gift

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!