• Download App
    अखिलेश यादवांसह अनेक नेत्यांनी महानवमीला दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल । Politicians including Akhilesh Yadav Wished RamNavmi On Maha Navmi Trolled by Social Users

    अखिलेश यादवांसह अनेक नेत्यांनी महानवमीला दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

    शारदीय नवरात्रीचा शेवटच्या दिवशी आज देशभरात महानवमी साजरी केली जात आहे, पण यावरूनही गोंधळ आहे. अनेक लोक या दिवशी रामनवमीच्या शुभेच्छा देत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचाही यात सहभाग होता. जेव्हा या नेत्यांनी ट्विटर आणि फेसबुकवर रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल केले. Politicians including Akhilesh Yadav Wished RamNavmi On Maha Navmi Trolled by Social Users


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शारदीय नवरात्रीचा शेवटच्या दिवशी आज देशभरात महानवमी साजरी केली जात आहे, पण यावरूनही गोंधळ आहे. अनेक लोक या दिवशी रामनवमीच्या शुभेच्छा देत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचाही यात सहभाग होता. जेव्हा या नेत्यांनी ट्विटर आणि फेसबुकवर रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल केले.

    उत्तर प्रदेश भाजप नेते देवेंद्र शर्मा यांनीही फेसबुकवर रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. नंतर त्यांनी महानवमीच्या शुभेच्छा दिल्या, परंतु आधीची पोस्ट हटवली नाही.

    रामनवमी आणि महानवमी मधील फरक

    हिंदू दिनदर्शिकेनुसार रामनवमी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात येते. भगवान रामाचा जन्म याच दिवशी झाला. चैत्र नवरात्रीचा शेवट रामनवमीने होतो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार हा सण मार्च-एप्रिलमध्ये येतो. त्याचवेळी शारदीय नवरात्रीमध्ये महावनमी येते. या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. ती महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेचा नववा अवतार असल्याचे म्हटले जाते. महानवमीच्या दुसऱ्या दिवशी भगवान रामाने रावधाचा वध केला, जो दसरा किंवा विजया दशमी म्हणून साजरा केला जातो.

    Politicians including Akhilesh Yadav Wished RamNavmi On Maha Navmi Trolled by Social Users

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!