वृत्तसंस्था
चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे संरक्षक प्रकाश सिंग बादल वयाच्या 94 व्या वर्षी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. देशाच्या राजकीय इतिहासातले हे रेकॉर्ड आहे. प्रकाश सिंग बादल यांनी आज त्यांच्या पारंपारिक लांबी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. या आधी लांबी मतदारसंघाचे त्यांनी सहा वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. Political record in the country: At the age of 94, Prakash Singh Badal is contesting from Lambi constituency !!
प्रकाश सिंग बादल यांनी मुक्तसर जिल्ह्यातील लांबी विधानसभा मतदारसंघातून 94 व्या वर्षी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे देशातले राजकीय रेकॉर्ड आहे. या आधी महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून सा. रे. पाटील हे 91 व्या वर्षी आमदार होते. तसेच शेकापचे नेते गणपतराव देशमुख हे देखील सांगोल्याचे त्यांच्या वयाच्या नव्वदीत आमदार होते. परंतु 94 वर्षे वय पूर्ण केल्यानंतर प्रकाश सिंग बादल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असे करणारे ते संपूर्ण देशातले पहिलेच लोकप्रतिनिधी ठरणार आहेत. याखेरीज 1970 च्या दशकात मुख्यमंत्री राहून नव्वदी पार केल्यानंतरही जनतेतून निवडून येऊन लोकप्रतिनिधी होणारे ते पहिलेच नेते ठरणार आहेत.
प्रकाश सिंग बादल हे 1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय कृषिमंत्री देखील राहिले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी स्थान भूषवले आहे. मात्र आता राजकीय नाते संपूर्ण तोडल्यानंतर ते वयाच्या 94 व्या वर्षी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
Political record in the country: At the age of 94, Prakash Singh Badal is contesting from Lambi constituency !!
महत्त्वाच्या बातम्या
- अल्पवयीन मुलाच्या भरधाव कार खाली ४ ठार
- महाविकास आघाडी हेच जर महाराष्ट्राचे भवितव्य तर महापालिका निवडणूकीला महाविकास आघाडी का घाबरते??
- लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, औरंगाबादेत दोन ट्रकची समोरासमोर धडक, ४ जण ठार, २२ जखमी
- नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या टोळीचा छडा; बीडमध्ये पोलिसांची कारवाई : दोघांना अटक