विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ३४ वर्षे जनतेची सेवा केल्यानंतर आता तामिळनाडूचे पोलीस महासंचालक प्रतिप फिलीप हे निवृत्त झाले आहेत. २१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळेस एएसपी प्रतीप फिलीप त्यांच्या निवडणूक सभेत उपस्थित होते. जेव्हा हल्लेखोराने आत्मघाती बॉम्ब स्फोट घडवून आणला, तेव्हा प्रतीप फिलिप त्याच्यापासून थोड्याच अंतरावर असल्याने जखमी झाले होते.
Policeman gets his 30 years old blood stained cap and badge back on his last day of work
द फ्री प्रेस जर्नल या वृत्तवाहिनीनुसार श्रीपेरबंदूर येथे माजी पंतप्रधान राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी आले असता मानवी बॉम्बस्फोट घडवून आणून त्यांची हत्या करण्यात आली. घटनास्थळी अनेक वस्तू पुराव्यांसाठी गोळा करण्यात आल्या. यामध्ये फिलिप यांच्या रक्ताने माखलेली कॅप आणि बॅजला ‘मटेरियल ऑब्जेक्ट्स’ नंबर ३८ & ३९ अशी नावे देण्यात आली. या वस्तूंशी फिलिप यांचे भावनिक नाते जोडले गेले आहे. त्यामुळे या वस्तू कोर्टाच्या ताब्यातून परत मिळावे यासाठी त्यांनी एक याचिका दाखल केलेली होती.
दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी, अल कायदाने पोलिसांना पाठवला ईमेल
या याचिकेसंदर्भात बाजू मांडल्यावर राजीव गांधी हत्या प्रकरणाचा निकाल देण्यात आल्यानंतर फिलिप यांची भावनिक आणि कायदेशीर मागणी लक्षात घेऊन त्यांना त्यांचा नेम बॅज आणि कॅप परत देण्यात आली. या प्रकरणाचा निकाल देण्यात आल्याने फिलिप यांच्या वकिलांनी बाजू मांडताना असे सांगितले की, सीबीआयचा या मागणीवर काही आक्षेप असू शकत नाही. १ लाख रुपयांच्या वैयक्तिक बॉन्डवर काही दिवसांसाठी फिलिप यांना त्यांचा नेम बॅज आणि रक्ताने माखलेली टोपी परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. राजीव गांधींच्या रक्ताने माखलेली ही कॅप परत घेऊन फिलिप निवृत्त झाले.
Policeman gets his 30 years old blood stained cap and badge back on his last day of work
महत्त्वाच्या बातम्या