• Download App
    पोलीसांनी टाकला छापा, प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात सापडला गांजा|Police raided Prashant Kishor's office and found cannabis

    पोलीसांनी टाकला छापा, प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात सापडला गांजा

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी व्यूहरचना आखत असलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात गांजा सापडला. परवरी येथे प्रशांत किशोर यांची संस्था ‘ आय-पॅक ‘च्या कार्यालयांवर पोलिसांनी छापा टाकला. त्याच्याकडे ड्रग्ज सापडले असून याप्रकरणी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.Police raided Prashant Kishor’s office and found cannabis

    गोव्यात परवरी येथे प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक संस्थेने आठ बंगले भाड्याने घेतले आहेत. या बंगल्यांवर शुक्रवारी पोलिसांनी छापा टाकला. या आठही बंगल्यांची झडती घेण्यात आली असून एका २८ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे गांजा सापडल्याचे सांगण्यात आले असून अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले असतानाच ही कारवाई झाली आहे.



    प्रशांत किशोर हे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल कॉँग्रेसची प्रचाराची रणनिती आखत आहेत. गोव्यात यावेळी तृणमूल काँग्रेस व आम आदमी पार्टी ताकदीने लढत असून तृणमूलची व्यूहरचना आखण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आली आहे.

    Police raided Prashant Kishor’s office and found cannabis

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    NEET Paper Leak : NTAला सर्वोच्च न्यायालयाचे फटकारे; ‘मागच्या चुका असूनही धडा घेतला नाही’, NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्र-सीबीआयला नोटीस

    Amit Shah : ‘घुसखोरांना शोधून भारताबाहेर पाठवणार’; अमित शहांचा मोठा इशारा, सीमासुरक्षेवर केंद्र सरकार अधिक आक्रमक

    Packaging Material : कच्च्या मालाच्या महागाईने उद्योगांवर दबाव; पॅकेजिंग साहित्य 56% महाग, कंपन्यांसमोर नवे आर्थिक संकट