विशेष प्रतिनिधी
लखनौ – नागरिकांना राज्यातील नद्यांमध्ये मृतदेह टाकण्यापासून रोखण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सशस्त्र पोलिसांनी गस्त घालण्याचा आदेश दिला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून गंगेतील मृतदेह कोविड रुग्णांचे असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Police force deployed on ganaga river bank
यासाठी गावातील प्रमुखांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ते म्हणाले, की मृतदेहांवर आदरपूर्वक अंत्यसंस्कार केले जायला हवेत. राज्य सरकारने अंत्यसंस्कारासाठी यापूर्वीच निधी मंजूर केला आहे.
मात्र, केवळ धार्मिक परंपरेमुळे कुणालाही गंगा नदीत मृतदेह टाकण्याची परवानगी देऊ नये. तसे करणाऱ्यांना गरज भासल्यास स्थानिक स्तरावर दंड ठोठवावा. मनुष्य व प्राण्यांच्या मृतदेहांमुळे नद्या प्रदूषित होत आहे. राज्यातील नद्या स्वच्छ करण्यासाठी सरकार विशेष मोहीम चालवत आहे. गृह, नागरी आणि ग्रामीण विकास विभागांनीही यांसदर्भात धोरण तयार करावे.
नदीमध्ये मृतदेह आढळत असल्यावरून उत्तर प्रदेश सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. हा प्रकार अमानवी, गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली होती.
Police force deployed on ganaga river bank
महत्त्वाच्या बातम्या
- Coronavirus Vaccine राज्यात आज आणि उद्या लसीकरण नाही; कोविन अँप अपडेशनसाठी बंद राहणार
- बहुधर्मी आसामच्या मुख्यमंत्र्यांचे बांगलादेशाच्या पंतप्रधानांकडून अभिनंदन; मोदींच्या विकासवादी मार्गाने चालण्याची हेमंत विश्वशर्मांची ग्वाही
- वैकुंठ स्मशानभूमीत महिला करतात अंत्यसंस्कार ; कोरोनाच्या संकटात 15 जणींचा समाजाला मोठा हातभार
- अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन व्यथित; ब्लॉगवरील रसिकांच्या टोकदार कमेंटचा परिणाम
- आनंदाची बातमी : केंद्र सरकारतर्फे राज्यांना आणखी १९२ लाख लशीचे डोस मोफत
- सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा सरन्यायाधीशांचा प्रस्ताव