• Download App
    देशाच्या विकासाचे अनेकांना अपचन, ते निराशेच्या गर्तेत बुडालेत, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधी, काँग्रेससह विरोधकांचा हल्लाबोल pm narendra modi gave befitting reply to oppsition in parliament

    देशाच्या विकासाचे अनेकांना अपचन, ते निराशेच्या गर्तेत बुडालेत, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधी, काँग्रेससह विरोधकांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – अदानी – हिंडेनबर्ग या मुद्द्यावरून खासदार राहुल गांधी, काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट संसदेत घेरले असताना मोदींनीही तितक्याच प्रखर भाषेत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. pm narendra modi gave befitting reply to oppsition in parliament

    सगळे जग आर्थिक संकटात सापडले असताना भारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. हे काही लोकांना पाहावत नाही. देशाचा विकास काही लोकांच्या पचनीच पडत नाही. ते निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी, काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांचा समाचार घेतला आहे.


    पंतप्रधान मोदींच्या भाऊ प्रल्हाद मोदींच्या गाडीला म्हैसूरजवळ अपघात, कुटुंबीयांसह रुग्णालयात दाखल


    राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाच्या चर्चेला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह सर्व विरोधकांना २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळातील युपीए सरकारची आठवण करून दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले, की २००४ ते २०१४ या कालावधीत रोज आर्थिक घोटाळ्यांच्याच बातम्या यायच्या. त्यावेळच्या सरकारने बेरोजगारी हटविण्याचे आश्वासन दिले. पण महागाई डबल डिजिट करून टाकली. आपल्या राजवटीत ते काही चांगले करू शकले नाहीत. पण आज जेव्हा देश प्रगती करतो आहे. १४० कोटी लोक आपल्या मेहनतीने देशाला पुढे घेऊन चालले आहेत, तेव्हा अनेकांना ही प्रगती पाहावत नाही. देशात काही चांगले चालले असेल, तर त्यांना निराशेचे झटके येतात.

    मोदी म्हणाले, की मी इंडोनेशियाला गेलो होतो. तेव्हा सगळे राष्ट्रप्रमुख भारताची प्रगती पाहून आचंबित झाले होते. भारतात डिजिटल पायाभूत सुविधा वाढल्याचे पाहून या सगळ्यांनी हे कसे साध्य केले असे विचारले. सगळ्यांना भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रचंड उत्सुकता आहे. पण काही लोकांना हे पाहावत नाही. त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत.

    pm narendra modi gave befitting reply to oppsition in parliament

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते