M narendra modi congratulates ebrahim raisi : इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इब्राहिम रईसी यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. शनिवारी जाहीर झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालात इब्राहिम रईसी यांना मोठा विजय मिळाला आहे. आता ते विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांची जागा घेतील. PM narendra modi congratulates ebrahim raisi after winning iran presidential election 2021
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इब्राहिम रईसी यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. शनिवारी जाहीर झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालात इब्राहिम रईसी यांना मोठा विजय मिळाला आहे. आता ते विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांची जागा घेतील.
पीएम मोदींचे ट्वीट
इब्राहिम रायसी यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले की, “इब्राहिम रईसी यांची इराणचे राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. भारत आणि इराणमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी त्यांच्यासोबत मिळून काम करेन.”
इराणमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत इब्राहिम रईसी शनिवारी मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. रईसी हे देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय मानले जातात.
अध्यक्षीय निवडणुकीत इराणच्या इतिहासातील सर्वात कमी मतदान झाले. प्राथमिक निकालांनुसार इब्राहिम रईसी यांना एक कोटी 78 लाख मते मिळाली होती. निवडणुकीच्या शर्यतीत एकमेव उदारमतवादी उमेदवार अब्दुल नासिर हेम्मती हे खूप मागे राहिले. तथापि, खोमेनी यांनी इब्राहिम रईसी यांचे सर्वात मजबूत विरोधकाला अपात्र ठरविले होते. यानंतर इब्राहिम रईसींनी हा मोठा विजय मिळवला.
कसे आहेत भारत-इराणचे संबंध?
भारत आणि इराणमधील संबंधांबद्दल सांगायचे झाल्यास आतापर्यंत दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आहेत. पण अलीकडे जेव्हा जम्मू-काश्मीरमधून भारताने कलम 370 काढून टाकले होते, तेव्हा इराण सरकारने विरोध दर्शवला होता. आता इराण चीनच्याही जवळ जाताना दिसत आहे.
PM narendra modi congratulates ebrahim raisi after winning iran presidential election 2021
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब काँग्रेसमध्ये घमासान, आमदार पुत्रांना सरकारी नोकरीप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध अनेक नेत्यांनी ठोकले शड्डू
- प्रताप सरनाईक यांच्या उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले – कोण त्रास देतोय ते शोधलं पाहिजे!
- स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं, संजय राऊत यांचा सूचक सल्ला
- सोनिया गांधी देश की बहू, गांधींशिवाय देश चालू शकत नाही – शत्रुघ्न सिन्हा
- 4 जुलैला सोलापुरात मराठा मोर्चा; परवानगी नाकारली तरी काढणारच, नरेंद्र पाटील आक्रमक