PM Narendra Modi : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णसंख्येत नवनवीन विक्रम नोंदवायला सुरुवात केलेली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती बिकट होत चालली आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून पत्रही लिहिले आहे. त्याचा अनुवाद येथे देत आहोत… PM Narendra Modi appeals to people on occasion of Vaccine Utsava, read in Details
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णसंख्येत नवनवीन विक्रम नोंदवायला सुरुवात केलेली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती बिकट होत चालली आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून पत्रही लिहिले आहे. त्याचा अनुवाद येथे देत आहोत…
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
आज 11 एप्रिल म्हणजेच ज्योतिबा फुले जयंतीपासून आपण देशवासीय ‘लस उत्सवा’ची सुरुवात करत आहोत. हा ‘लस उत्सव’ 14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत सुरू राहील.
हा उत्सव, एक प्रकारे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात आहे. यात आपल्याला Personal Hygiene सोबतच Social Hygiene वरही विशेष जोर लावायचा आहे.
आपण या चार बाबी, जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत..
Each One- Vaccinate One, म्हणजेच जे लोकं कमी शिकलेले आहेत, बुजुर्ग आहेत, जे स्वत: जाऊन लस घेऊ शकत नाहीत, त्यांची मदत करावी.
Each One- Treat One, म्हणजेच ज्या लोकांकडे पुरेशी साधने नाहीत, ज्यांना कमी माहिती आहे, त्यांची कोरोनावरील उपचारांत मदत करावी.
Each One- Save One, म्हणजेच मी स्वत: मास्क घालेन आणि याप्रकारे स्वत:ला Save करेन आणि इतरांनाही Save करेन, यावर विशेष जोर द्यायचा आहे.
आणि चौथी महत्त्वाची बाब, एखाद्याला कोरोना झाल्याच्या स्थितीत , ‘माइक्रो कन्टेनमेंट झोन’ बनवण्याचे नेतृत्व समाजातील लोकांनी करावे. जेथे कुठे एकही कोरोनाची पॉझिटिव्ह केस आली आहे, तेथे कुटुंबातील लोकांनी, समाजातील लोकांनी ‘माइक्रो कन्टेनमेंट झोन’ बनवावा.
भारतासारख्या सघन लोकसंख्येच्या आपल्या देशात कोरोनाविरुद्ध युद्धाची एक महत्त्वपूर्ण पद्धत ‘माइक्रो कन्टेनमेंट झोन’ही आहे.
एकही पॉझिटिव्ह केस आढळल्यावर आपण सर्वांनी जागरूक राहणे, इतरांचेही टेस्टिंग करणे खूप आवश्यक आहे.
यासोबतच जे लस देणारे अधिकारी आहेत, त्यांनाही लस मिळावी, याचा पूर्ण प्रयत्न समाजानेही करायचा आहे आणि प्रशासनानेही.
एकाही लसीचे नुकसान होऊ नये, हे आपल्याला सुनिश्चित करायचे आहे. आपल्याला झीरो व्हॅक्सिन वेस्टकडे जायचे आहे.
यादरम्यान आपल्याला देशाच्या लसीकरण क्षमतेत ऑप्टिमम यूटिलाइजेशनकडे जायचे आहे. हीसुद्ध आपली क्षमता वाढवण्याची एक पद्धत आहे.
आपले यश यावरून निश्चित होईल की, ‘माइक्रो कन्टेनमेंट झोन’बद्दल किती जागरूकता आपल्यात आहे.
आपले यश यावरून निश्चित होईल की, जेव्हा गरज नसेल, तेव्हा आपण घराबाहेर न निघावे.
आपले यश यावरून निश्चित होईद की, जे लस देणारे अधिकारी आहेत, त्यांना लस मिळावी.
आपले यश यावरून निश्चित होईल की, आपण मास्क घालणे आणि इतर नियमांचे कशा पद्धतीने पालन करतो.
मित्रांनो,
या चार दिवसांत व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि प्रशासनिक पातळीवर आपण आपापले लक्ष्य बनवायचे आहे. ते प्राप्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे आहेत.
मला पूर्ण विश्वास आहे, अशाच प्रकारे जनभागीदारीतून, जागरूक राहून, आपली जबाबदारी सांभाळत, आपण पुन्हा एकदा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होऊ.
लक्षा ठेवा- दवाई भी, कड़ाई भी!
धन्यवाद!तुमचाच,
नरेन्द्र मोदी.
PM Narendra Modi appeals to people on occasion of Vaccine Utsava, read in Details
महत्त्वाच्या बातम्या
- काळजाचं पाणी करणारी घटना : बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची फक्त 500 रुपयांसाठी हत्या, मृतदेह न्यायलाही नव्हते कुटुंबाकडे पैसे
- मद्यप्रेमींवर सरकार मेहेरबान, मुंबईत लॉकडाऊन काळातही मिळेल दारू, होम डिलिव्हरीसाठी या आहेत अटी
- देशात १३ एप्रिलपासून चार दिवस बँका राहणार बंद ; १२ एप्रिलला कामे पूर्ण करा ; अन्यथा वाट पाहावी लागणार
- दिल्लीत शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, 200 दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान
- देशभरात आजपासून चार दिवस ‘लस उत्सव’ ; कोरोनाविरोधी लस नागरिकांना देणार