पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्याला भेट देणार आहेत, येथे ते गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणाऱ्या गोवा मुक्तिदिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील. PM Modi will be involved in Goa Liberation Day Celebration today, will give a gift of 650 crore project
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्याला भेट देणार आहेत, येथे ते गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणाऱ्या गोवा मुक्तिदिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील.
स्वातंत्र्यसैनिकांचा करणार सन्मान
गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाने राबवलेल्या “ऑपरेशन विजय”च्या स्वातंत्र्यसैनिकांचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय ते नूतनीकरण करण्यात आलेले अगौडा जेल म्युझियम, गोवा मेडिकल कॉलेजचा सुपर स्पेशालिटी विभाग आणि न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय यासह इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान मोपा विमानतळावरील एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि मडगाव येथील दाबोलिम-नवेलीम येथे गॅस उपकेंद्राचे उद्घाटन करतील, असे पीएमओने सांगितले. मोदी कायदेशीर शिक्षण आणि संशोधनासाठी इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची पायाभरणीही करतील.
गोव्यात पुढील वर्षी निवडणुका
पुढील वर्षाच्या सुरुवातीला गोव्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय लष्कराने पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘गोवा मुक्ती दिन’ साजरा केला जातो.
PM Modi will be involved in Goa Liberation Day Celebration today, will give a gift of 650 crore project
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब : भारत-पाकिस्तान सीमेलगत सीमा सुरक्षा दलाने ड्रोनवर केला गोळीबार
- Surrogacy Bill : लोकसभेत संमत; नॅशनल सरोगसी बोर्ड आणि राज्य सरोगसी बोर्ड स्थापन;कमर्शियल सरोगसीला चाप
- दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये हुडहुडी; हिमाचल, काश्मिरमध्ये बर्फवृष्टीने गारवाच गारवा
- सातारा : पोवईनाक्यावर डांबराच्या ट्रकने अचानक घेतला पेट