विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह जगभरातील शंभरहून अधिक देशांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.PM modi will address UN
आमसभेचे हे ७६ वे सत्र २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत होईल. पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबरला आमसभेला संबोधित करणार आहेत. ‘क्वाड’ गटातील देशांच्या बैठकीसाठी ते २४ तारखेलाच अमेरिकेला रवाना होणार आहेत. मोदींसह १०९ देशांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित रहात भाषण करणार असून ६० देशांचे प्रमुख व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांचे म्हणणे मांडतील. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन हे आमसभेत प्रथमच भाषण करणार आहेत.
आमसभेत अफगाणिस्तानचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत गुलाम ईसकझाई यांनाही बोलण्याची संधी मिळणार आहे. आमसभेतील अखेरचे भाषण ईसकझाई यांचे असेल. त्यांची नेमणूक अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांनी केली होती. त्यांना बदलण्याबाबतचा कोणताही निर्णय तालिबान सरकारने अद्यापपर्यंत घेतलेला नाही. म्यानमार आणि गिनिया या देशांच्या राजदूतांनाही अखेरच्या दिवशी बोलण्याची संधी मिळणार आहे. गिनियामध्ये गेल्याच आठवड्यात लष्कराने बंड करत सत्ता आपल्या हातात घेतली आहे.
PM modi will address UN
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप
- वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप