विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जूनपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. ते 23 जूनपर्यंत अमेरिकेत राहणार आहेत. 2014 पासून पीएम मोदी 6 वेळा अमेरिकेला गेले आहेत. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या तीन राष्ट्राध्यक्षांना ते भेटले आहेत. परंतु पंतप्रधानांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे. याकडे एक विशेष सन्मान म्हणून पाहिले जात आहे, जो अमेरिका आपल्या खास मित्रराष्ट्रांसाठी राखून ठेवत असतो. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींचा अमेरिकेचा राजकीय दौरा होत आहे.PM Modi to Meet Indian Community in America, Award Winning Singer to Perform, Know Everything About the Event
या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील आणि असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी डिनरचं आयोजन केलं आहे. यासोबतच पंतप्रधानांचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाला संबोधित करण्याचा कार्यक्रमही आहे. हा कार्यक्रम खास बनवण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
रोनाल्ड रीगन सेंटरमध्ये पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम
23 जून रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टन डीसीमधील रोनाल्ड रीगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर येथे देशभरातील समुदायाच्या नेत्यांच्या निमंत्रित मेळाव्याला संबोधित करतील. भारतीय समुदायासोबत मोदींचा कार्यक्रम “भारताच्या वाढीची कहाणी” मधील त्यांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करेल. हा कार्यक्रम अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार 7 ते 9 वाजेपर्यंत असेल.
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांमध्ये डॉक्टर, हॉटेलवाले, वकील आणि भारतीय वंशाचे व्यापारी असतील. रोनाल्ड रीगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटरने यापूर्वी अनेक उच्च-प्रोफाइल बैठका आयोजित केल्या आहेत.
ET च्या मते, हा कार्यक्रम यूएस इंडिया कम्युनिटी फाउंडेशनद्वारे आयोजित केला जात आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 25 प्रतिष्ठित लोकांची राष्ट्रीय आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.
आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन या आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसाठी परफॉर्म करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामा आणि जॉर्ज डब्ल्यू बुश या शेवटच्या तीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी परफॉर्म करण्याचा मान त्यांना मिळालेला आहे.
21 जून रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनातही मिलबेन सहभागी होतील. त्यांना भारताच्या स्थायी प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्रात आमंत्रित केले आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पीएम मोदींच्या व्यग्र शेड्यूलमुळे, रोनाल्ड रीगन सेंटरमधील पीएम मोदींचा कार्यक्रम तुलनेने मर्यादित असेल आणि केवळ 1000 लोकच त्यात सहभागी होऊ शकतील. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या नेत्यांची निराशा झाली आहे, कारण ते एका मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करत होते.
अमेरिकेतील भारतीय समुदायाचे लोकप्रिय नेते आणि अमेरिकेतील पंतप्रधान मोदींच्या रोनाल्ड रीगन सेंटरच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. भरत बारई म्हणाले की, पंतप्रधान हे केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक व्यक्ती आहेत.
PM Modi to Meet Indian Community in America, Award Winning Singer to Perform, Know Everything About the Event
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट
- आधी पक्षातून हकालपट्टी नंतर अटकही, ‘द्रमुक’च्या प्रवक्त्याला भाजपा नेत्या खुशबू सुंदरवर केलेली वादग्रस्त टिप्पणी भोवली!
- घरात बसणार्यांना मोदी-शाह काय कळणार? अकोल्यात फडणवीसांची बोचरी टीका
- ‘’अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल!