• Download App
    PM Modi Speech : भाजप निवडणुका जिंकण्याची मशीन नव्हे, तर मने जिंकण्याची मोहीम, मोदींचे टीकाकारांना उत्तर । PM Modi Speech on BJP Foundation Day says BJP Is A campaign to win hearts

    PM Modi Speech : भाजप निवडणुका जिंकण्याची मशीन नव्हे, तर मने जिंकण्याची मोहीम, मोदींचे टीकाकारांना उत्तर

    PM Modi Speech : भारतीय जनता पक्षाने गेल्या 41 वर्षांत देशातील प्रत्येक राज्यात आपली पाळेमुळे रोवली आहेत. यासाठी अनेक पिढ्यांनी मेहनत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा उल्लेख केला आणि म्हणाले की, अशा लोकांच्या आशीर्वादाने पक्ष पुढे गेला आहे. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीपेक्षा मोठा आणि पक्षापेक्षा मोठा देश हा भाजपसाठी नेहमीच मंत्र ठरला आहे. श्यामा प्रसाद मुखर्जींपासून ते आजतागायत ही परंपरा कायम आहे. PM Modi Speech on BJP Foundation Day says BJP Is A campaign to win hearts


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने गेल्या 41 वर्षांत देशातील प्रत्येक राज्यात आपली पाळेमुळे रोवली आहेत. यासाठी अनेक पिढ्यांनी मेहनत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा उल्लेख केला आणि म्हणाले की, अशा लोकांच्या आशीर्वादाने पक्ष पुढे गेला आहे. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीपेक्षा मोठा आणि पक्षापेक्षा मोठा देश हा भाजपसाठी नेहमीच मंत्र ठरला आहे. श्यामा प्रसाद मुखर्जींपासून ते आजतागायत ही परंपरा कायम आहे.

    श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारांची शक्ती अशी आहे की, आपण त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो आणि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून टाकू शकलो. त्याचप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मतामुळे सरकार पडल्याचे मान्य केले, पण पक्षाच्या मूल्यांशी तडजोड केली नाही. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षांत केंद्रातील आपल्या सरकारच्या कामगिरीची मोजणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नवीन कृषी कायद्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकर्‍यांची स्थिती सुधारली आहे.

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत सरकारच्या घोषणांवरून त्यांचे आकलन होत होते, पण आमच्या सरकारचे रिपोर्ट कार्डवरून होते आहे. नीती, नियतपासून डिलिव्हरीपर्यंत आम्ही दृढतेने कार्य केले आहे. यादरम्यान त्यांनी भाजपच्या निवडणुकीतील विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांवरही हल्ला चढविला. ते म्हणाले की, जेव्हा भाजप निवडणूक जिंकते तेव्हा निवडणूक जिंकण्याचे मशीन म्हटले जाते आणि जेव्हा दुसरा पक्ष जिंकतो तेव्हा त्यांचे कौतुक केले जाते. ते म्हणाले की, भाजपला निवडणूक जिंकण्याची मशीन म्हणणे म्हणजे देशवासीयांचा अपमान आहे. भाजप निवडणुका जिंकण्याचे मशीन नसून, मने जिंकण्याचे मोहीम आहे.

    पीएम मोदी म्हणाले की, आम्ही संपूर्ण 5 वर्षे जनतेशी जोडलेले राहतो आणि त्यांच्यासाठी जगतो. यानंतर जेव्हा आपण निवडणुका घेतो तेव्हा लोकांचा पाठिंबा मिळतो. आमचा पक्ष जिंकला याचा आम्हाला गर्व नाही. आम्हाला याचा गर्व आहे की, देशातील जनतेने आम्हाला जिंकवले. पीएम मोदी म्हणाले की, आज आमचा पक्ष खेड्यांपासून ते शहरांपर्यंत विस्तारला आहे. राष्ट्रीय हितांबरोबरच आपला पक्षदेखील प्रादेशिक आकांक्षांचा पक्ष आहे. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही पद्म पुरस्कार सुधारले आहेत आणि अशा लोकांना आदर दिला आहे, ज्यांच्या कामांची दखल घेतली जात नव्हती.

    पंतप्रधान म्हणाले की, शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षासाठी बलिदान दिले आहे. पश्चिम बंगाल आणि केरळसारख्या राज्यांत आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात. त्यांच्या कुटुंबावर हल्ले होतात. तरीही, एका विचारासाठी ठाम राहून त्याच्यासाठी संकल्पासह पुढे जाणे हे आपल्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे. आज घराणेशाहीची अवस्थाही देश पाहत आहे. स्थानिक आकांक्षांसोबत उभे राहिलेले पक्षही कुटुंबापुरते मर्यादित राहिले. त्यांच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला आहे. आपल्याकडे सेक्युलॅरिझमचा अर्थ हा काही लोकांनीच धोरणे ठरवण्यापर्यंत उरला आहे. परंतु जो सर्वांना सोबत घेऊन चलतो, त्याला हे लोक सांप्रदायिक ठरवतात.

    PM Modi Speech on BJP Foundation Day says BJP Is A campaign to win hearts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला