• Download App
    “पूर्वोत्तर अब ना दिल से और ना ही दिल्ली से दूर” तीन राज्यांच्या निवडणूकीत भाजपाच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींचे विधान! | %sit“पूर्वोत्तर अब ना दिल से और ना ही दिल्ली से दूर” तीन राज्यांच्या निवडणूकीत भाजपाच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींचे विधान! PM Modi speech after BJP success in elections in Tripura Meghalaya and Nagalandename%

    “पूर्वोत्तर अब ना दिल से और ना ही दिल्ली से दूर” तीन राज्यांच्या निवडणूकीत भाजपाच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींचे विधान!

    भाजपा मुख्यालयामध्ये जल्लोष; जाणून घ्या या ठिकाणी भाषणात मोदी काय म्हणाले?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निवडणूकीत भाजपाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचे आभार मानत, आपल्या भावना व्यक्त केल्या आणि देशभरातली भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले.PM Modi speech after BJP success in elections in Tripura Meghalaya and Nagaland

    पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘’पूर्वोत्तर अब ना दिल से और ना ही दिल्ली से दूर है’’ हा निकाल मनांमधील अंतर संपवून नवीन विचार प्रतिबिंबीत करतो. हा नवीन युग आणि नवा इतिहास रचला जात असल्या क्षण आहे. निवडणूक जिंकण्यापेक्षा जास्त मला याचे समाधान आहे की, पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात मला जास्तीत जास्त ईशान्येकडे जाऊन तेथील लोकांची मनं जिंकता आली. आजचा निकाल दाखवून देतो की भारतात लोकशाहीबद्दल भक्कम आशावाद आहे. या तिन्ही राज्यांमधील जनतेने आपल्या सहकारी पक्षांना भरपूर आशीर्वाद दिला आहे. दिल्ली कार्य करणे भाजपासाठी अवघड नाही, परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी ईशान्येत दुप्पट मेहनत केली. मी त्यांच्या मेहनतीला दाद देतो आणि त्यांना धन्यवादही देतो.’’


    मेघालयमध्ये NPP;ला भाजपाचा पाठिंबा; सरकार स्थापन करण्यासाठी संगमांनी अमित शहांना केला फोन


    याशिवाय, मागील वर्षांमध्ये भाजपा मुख्यालय अशा अनेक क्षणांचे साक्षीदार बनले आहे. आज आपल्याला जनतेचे पुन्हा एकदा विनम्रतेने आभार मान्याची संधी मिळाली आहे. मी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या जनतेचे नतमस्तक होवून आभार व्यक्त करतो. असंही मोदी म्हणाले.

    याचबरोबर विरोधकांवर निशाणा साधताना मोदींनी म्हटले की, आपले काही शुभचिंतकही आहेत, ज्यांना याचा त्रास होतोय की अखेर भाजपाच्या विजयाचे रहस्य काय आहे? आतापर्यंतच्या निकालापर्यंत मी तर टीव्ही नाही पाहिला आणि हेही नाही पाहिले की ईव्हीएमला दोष देणे सुरू झाले की नाही. पंतप्रधान मोदींनी भाजपाच्या सातत्याच्या विजयाबद्दल शासकीय कामकाज आणि कामाच्या पद्धती व कार्यकर्त्यांचा सेवा भाव अशा त्रिवेणीला श्रेय दिले.

    पंतप्रधान मोदींनी अनोख्या पद्धतीने मानले मतदारांचे आभार –

    पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थितांना मोबाईलची बॅटरी लावण्यास सांगून म्हटले की,  तुम्ही जो मोबाईलद्वारे प्रकाश पसरवला आहे. तो ईशान्येकडील नागरिकांचा सन्मान आहे. ईशान्येच्या देशभक्तीचा सन्मान आहे, विकासाच्या मार्गावर जाण्याचा सन्मान आहे. हा प्रकाश त्यांचा सन्मान आहे, त्यांचा गौरवासाठी आहे. तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो.

    PM Modi speech after BJP success in elections in Tripura Meghalaya and Nagaland

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य