विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत काही ठाम विधाने करून प्रादेशिक राजकीय पक्षांच्या घराणेशाहीवर प्रहार केला भाजपमधील या खासदारांना देखील कोणाचे तिकीट कापले तर जिम्मेदारी माझी पण पक्षात घराणेशाही चालणार नाही असा कडक शब्दांमध्ये इशारा दिला. मोदींच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. विशेषत: भाजपच्या अंतर्गत वन वर्तुळात तर घराणेशाहीतून निवडून आलेल्या खासदारांमध्ये प्रचंड धाकधूक वाढली आहे. PM Modi on Dynasty bjp vs congress
2024 च्या लोकसभा निवडणुकांना अजून दोन वर्षे अवकाश आहे, पण त्यापूर्वीच भाजपच्या खासदारांमध्ये विशेषतः घराणेशाही मधून निवडून आलेल्या खासदारांमध्ये मोदींच्या भाषणानंतर अधिक चलबिचल झाली आहे.
प्रादेशिक घराणेशाही वर प्रहार
मोदींनी काँग्रेस मधल्या घराणेशाहीवर कायमच प्रहार केला आहे पण त्यापलीकडे जाऊन आता त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीवर प्रहार करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मधल्या घराणेशाहीतून निवडून आलेल्या खासदारांवर नजर टाकली तर एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे मोदींना 2024 च्या निवडणुकीसाठी फार “मोठे ऑपरेशन” घराणेशाहीच्या उच्चाटनासाठी “फार मोठे ऑपरेशन” करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
– भाजपचे 45 खासदार घराणेशाहीतले
“द प्रिंट”ने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या 303 खासदारांपैकी 45 खासदार हे घराणेशाही मतून निवडून आले आहेत. काही खासदारांची मुले राज्यांच्या विधानसभांमध्ये आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकप्रतिनिधित्वाचा संपूर्ण देशात टक्का वाढत असताना घराणेशाहीला मुळापासून सुरुंग लावणे पंतप्रधान मोदी यांना शक्य होईल का…??, असा कळीचा सवाल विचारला जात आहे.
– भाजपचे सर्वोच्च नेतृत्व घराणेशाहीतून नाही
भाजपचे सर्वोच्च नेतृत्व घराणेशाहीतून आलेले नाही हे खरे, कारण भाजपचे कोणतेही राष्ट्रीय अध्यक्ष घराणेशाहीची संबंधित नाहीत. भाजपा अध्यक्षांची यादी आधी पाहिली तर अटल बिहारी वाजपेयी पासून जेपी नंदन पर्यंत कोणीही घराणेशाही झालेले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले नाहीत.
पण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यापासून पुढे घराणेशाही सुरू झालेली दिसते. भाजप मधल्या यादी काढायची झाली तर तालुकापातळीपर्यंत भाजपमध्ये देखील तितकीच घराणेशाही रुजली आहे हे दिसून येते.
केंद्रीय मंत्री पैकी राजनाथ सिंग यांचा मुलगा पंकज सिंग आमदार आहे. वेदप्रकाश गोयल यांचे चिरंजीव पियुष गोयल राज्यसभेचे नेते आहेत. गोपीनाथ मुंडे त्यांची मुलगी प्रीतम खासदार आहे.
– घराणेशाहीची उदाहरणे
प्रमोद महाजन – पूनम महाजन
गोपीनाथ मुंडे – पंकजा मुंडे – प्रीतम मुंडे
विजयकुमार गावित – हिना गावित
नारायण राणे – नितेश राणे
देवेंद्र प्रधान – धर्मेंद्र प्रधान
प्रेम कुमार धुमल – अनुराग ठाकूर
मेनका गांधी – वरूण गांधी
ज्योतिरादित्य शिंदे – वसुंधरा राजे – दुष्यंत सिंग
– रमण सिंग – अभिषेक सिंह
कल्याण – राजवीर सिंह
महाराष्ट्रातही स्थानिक पातळीवर मोठी घराणेशाही 25 पेक्षा अधिक भाजपचे आमदार खराडी शाळेतून निवडून आले आहेत निवडून आले आहेत असाच या आमदारांची घराणेशाही काँग्रेस परिवारातून आली आहे.
– हा फक्त खासदारांना इशारा
त्यामुळेच मोदी यांनी घराणेशाही विरुद्ध भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत तरी मोठा आवाज उठवला असला तरी ते मोठे ऑपरेशन कितपत करू शकते आणि त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत जर तसे ऑपरेशन केले तर भाजपच्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी दिवसाचा टाका कसा असेल हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे पण त्याचवेळी भाजपा संघटनेला डॅमेज होऊ नये आणि संघटना पुरेसा राजकीय मेसेज जावा यासाठीच मोदींनी संसदीय पक्षाच्या बैठकीत हे विधान केले असे मर्यादित अर्थाने मानण्यात येत आहे.