Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी मन की बात द्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी देशवासीयांना आपल्या सर्व ऑलम्पिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याचे तसेच व्हिक्टरी पंच अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधानांनी 26 जुलै रोजी असणाऱ्या कारगिल विजय दिवसाचे स्मरण केले आणि त्या निमित्ताने कारगिल योद्ध्यांना वंदन केले. pm modi mann ki baat Top Ten Points tokyo olympic kargil war independence day corona protocol
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी मन की बात द्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी देशवासीयांना आपल्या सर्व ऑलम्पिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याचे तसेच व्हिक्टरी पंच अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधानांनी 26 जुलै रोजी असणाऱ्या कारगिल विजय दिवसाचे स्मरण केले आणि त्या निमित्ताने कारगिल योद्ध्यांना वंदन केले.
लस घेतलेल्यांना मोफत छोले भटुरे खाऊ घालणाऱ्या संजय यांचे कौतुक
पंतप्रधान मोदी आपल्या संबोधनात म्हणाले की, एक मित्र चंदीगड शहरा तलेआहेत. चंदीगड मध्ये मी देखील काही वर्ष राहिलो आहे . खूपच आनंदी आणि सुंदर शहर आहे. तिथे राहणारे लोक देखील दिलदार आहेत . आणि हो, तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल तर इथे तुम्हाला आणखी मजा येईल. या चंदिगडमधील सेक्टर 29 मध्ये संजय राणा फुड स्टॉल चालवतात. आणि सायकलवर छोले भटूरे विकतात. एक दिवस त्यांची मुलगी रिद्धिमा आणि भाची रिया एक कल्पना घेऊन त्यांच्याकडे आल्या. दोघींनीही त्यांना कोविड लस घेणाऱ्यांना मोफत छोले-भटूरे खायला द्यायला सांगितलं. ते आनंदाने तयार झाले आणि त्यांनी लगेच हे उत्तम आणि नेक कार्य सुरु केले. संजय राणा यांचे छोले-भटूरे मोफत खाण्यासाठी तुम्हाला दाखवावे लागेल कि तुम्ही त्यादिवशी लस घेतलेली आहे. लसीकरणाचा संदेश दाखवला की लगेचच ते तुम्हाला स्वादिष्ट छोले-भटूरे देतील. असे म्हणतात समाजाच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी पैशांपेक्षा जास्त सेवाभाव, कर्तव्य भावनेची अधिक गरज असते . आपले संजय भाऊ हेच सिद्ध करत आहे.
तसेच यावेळी पंतप्रधानांनी Rashtragaan.in या संकेत स्थळावर जाऊन एकाच वेळी जास्तीत जास्त भारतीयांनी राष्ट्रगीत गाण्याच्या अभियानामध्ये सामील होण्याचे आवाहन केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की आपण जेव्हा कधी खादीचे उत्पादन खरेदी करतो त्यावेळी त्याचा लाभ आपल्या गरीब विणकर बंधू-भगिनींना होतो हे सांगून त्यांनी आपणा सर्वांना ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या वस्तू खरेदी करण्याची विनंती केली
मन की बात कार्यक्रमांमध्ये आपले संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या सर्व तरुणांचे पंतप्रधानांनी आभार मानले आणि हे युवक मन की बात कार्यक्रमाला दिशा देण्याचे काम करत आहेत असे पंतप्रधान पुढे म्हणाले. यावेळी देशाच्या वेगवेगळ्या भागात तरुण-तरुणी वेगवेगळ्या नवीन उपक्रमांद्वारे तसेच नवोन्मेषी कार्यक्रमांद्वारे करत असलेल्या विविध प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि ओडिशाचे इसाक मुंडा, आंध्र प्रदेश मधील साई प्रनीथ आणि अशी इतर उदाहरणे पंतप्रधानांनी यावेळी दिली
केळीच्या फायबर पासून वस्तू तसेच केळीच्या पिठापासून इतर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या लखीमपुर-खीरी येथील उपक्रमांचे यावेळी पंतप्रधानांनी कौतुक केले.
सेंट क्वीन केटेवान यांचे पवित्र अवशेष जपून ठेवणाऱ्या गोव्याच्या जनतेचे पंतप्रधानांनी आभार मानले आणि यामुळे गोवा आणि जॉर्जिया यांच्यामधील संबंध अधिक दृढ झाले आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. यावेळी समारोप करताना पंतप्रधानांनी पाणी वाचवण्याचे तसेच कोविड योग्य वर्तणूक जारी ठेवण्याचे आवाहन केले.
pm modi mann ki baat Top Ten Points tokyo olympic kargil war independence day corona protocol
महत्त्वाच्या बातम्या
- Pegasus Issue : पेगासस वादावरून माकप खासदाराची सुप्रीम कोर्टात धाव, SIT चौकशीसाठी याचिका दाखल
- Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या संयुक्त खात्यात परदेशातून पैसे; आता ईडी करणार मनी लॉन्ड्रिंगची चौकशी
- गल्लत गोल्ड मेडलची : प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, लोकांना वाटले ऑलिम्पिक गोल्ड
- मल्ल्याचे प्रत्यार्पण : परराष्ट्र सचिव शृंगला म्हणाले – ब्रिटनने दिले आश्वासन, पळपुटा मल्ल्या परत येण्याची आशा वाढली
- जिनपिंग यांची तिबेट भेट : चिनी राष्ट्रपतींनी सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला, युद्धाच्या तयारीवर केले हे वक्तव्य