CBI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने सोमवारी देशाची प्रमुख तपास संस्था CBIचे नवे अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत सीबीआय डायरेक्टर पदासाठी तीन नावांचा विचार करण्यात आला. यामध्ये सुबोध जयस्वाल, केआर चंद्रा आणि व्हीकेएस कौमुदी यांच्या नावांचा समावेश आहे. PM Modi Led Panel Decides Three Names For New CBI Chief
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने सोमवारी देशाची प्रमुख तपास संस्था CBIचे नवे अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत सीबीआय डायरेक्टर पदासाठी तीन नावांचा विचार करण्यात आला. यामध्ये सुबोध जयस्वाल, केआर चंद्रा आणि व्हीकेएस कौमुदी यांच्या नावांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी सीबीआयचे नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी 90 मिनिटांची बैठक घेतली.
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, यादरम्यान 1984, 1985, 1986 आणि 1987च्या बॅचच्या 100 अधिकाऱ्यांचे सीव्ही तपासण्यात आले. यावेळी सुबोध जयस्वाल, केआर चंद्र आणि व्हीकेएस कौमुदी यांची नावे अखेर निश्चित झाली. आता सरकार यापैकी कोणालाही सीबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्त करू शकते.
यातील सुबोध जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या डीजी सीआयएसएफ आहेत. के.आर.चंद्र सध्या सशस्त्र सीमा बलचे संचालक आहेत. त्याच वेळी व्हीकेएस कौमुदी हे गृह मंत्रालयातील अंतर्गत सुरक्षा विभागातील विशेष सचिव आहेत.
दरम्यान, सीबीआय डायरेक्टर पदासाठी राकेश अस्थाना आणि वाय.सी. मोदी यांची नावेही समोर आली होती. परंतु आता ही तीन नावे समोर आल्याने सीबीआयचा नवा बॉस कोणत्याही वादात नसलेला मिळण्याची शक्यता वाढली आहे.
राकेश अस्थाना हे 1984 बॅचचे अधिकारी असून सध्या ते डीजी बीएसएफ आहेत. वाय.सी. मोदी हे 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख आहेत. अस्थाना आणि मोदी पुढील काही महिन्यांत निवृत्त होणार आहेत.
यापूर्वी निवड समितीने ऋषिकुमार शुक्ला यांची देशातील सीबीआयचे नवे संचालक म्हणून निवड केली होती. त्यांची नियुक्ती 4 फेब्रुवारी 2019 रोजी झाली होती. तत्पूर्वी सरकारने 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी प्रवीण सिन्हा यांना सीबीआयचे कार्यवाहक म्हणून नेमले होते. यानंतर पूर्णवेळ सीबीआय संचालकांचा शोध सुरू आहे.
PM Modi Led Panel Decides Three Names For New CBI Chief
महत्त्वाच्या बातम्या
- हरियाणा सरकारचा मोठा निर्णय : पतंजलीच्या १ लाख कोरोनिल किट कोरोना रुग्णांना मोफत वाटणार
- Narada Sting Case : नजरकैदेतील तृणमूल नेत्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- PNB SCAM : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी बेपत्ता, अँटिगुआ पोलिसांकडून शोध सुरू
- Toolkit Case : दिल्ली पोलिसांनी ट्विटर ऑफिसवर छापेमारी नाकारली, म्हणाले – फक्त नोटीस दिली, छापा नव्हता!
- फायझर आणि मॉडर्नाकडे आधीच पुष्कळ ऑर्डर, लसीसाठी भारताला प्रदीर्घ वाट पाहावी लागण्याची शक्यता