• Download App
    CBSEच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींनी दिला सुखद धक्का, ऑनलाइन मीटिंगमध्ये अचानक एंट्री करून विद्यार्थ्यांशी हितगुज । PM Modi Joined A Session With CBSE Students Organized By The Education Ministry today

    CBSE च्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींनी दिला सुखद धक्का, ऑनलाइन मीटिंगमध्ये अचानक एंट्री करून विद्यार्थ्यांशी हितगुज

    CBSE : शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी सीबीएसई विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली. बैठकीत परीक्षा रद्द होण्यावर चर्चा सुरू झाली तेव्हा अचानक अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत सामील झाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळा संवाद साधला. संभाषणादरम्यान बहुतांश विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. एका विद्यार्थ्याने सांगितले की, मला माहिती आहे की परीक्षा रद्द होणार आहे. मग मोदींनी त्याला हसून विचारले की तू ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोस का? PM Modi Joined A Session With CBSE Students Organized By The Education Ministry today


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी सीबीएसई विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली. बैठकीत परीक्षा रद्द होण्यावर चर्चा सुरू झाली तेव्हा अचानक अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत सामील झाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळा संवाद साधला. संभाषणादरम्यान बहुतांश विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. एका विद्यार्थ्याने सांगितले की, मला माहिती आहे की परीक्षा रद्द होणार आहे. मग मोदींनी त्याला हसून विचारले की तू ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोस का?

    कर्नाटकमधील नंदन हेगडे हा विद्यार्थी म्हणाला की, ही परीक्षा माझ्या आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही. आगामी परीक्षांना सामोरे जायचे आहे. यावर मोदी म्हणाले की, आता अनेक कार्यक्रम येणार आहेत. आयपीएल पाहाल किंवा चॅम्पियन्स लीग किंवा ऑलिम्पिक फायनल पाहाल. यात तुमचे मन नक्कीच लागेल. यावर नंदन म्हणाला की, नक्कीच पाहू.

    1 जून रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधानांनी सीबीएसईच्या बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. यानंतर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशनेही त्यांच्या राज्य बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

    यादरम्यान गुवाहाटी येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की, मी दहावीत होतो आणि प्रवास करत असताना मी तुमचे पुस्तक पाहिले. तुम्ही असे लिहिले आहे की, एखाद्या उत्सवाप्रमाणे परीक्षा साजरी करा. आम्ही उत्सवाप्रमाणे परीक्षेची तयारी केली. परिस्थिती आता चांगली नाही, हे मान्य. परंतु उत्सवाला काय भ्यायचे? आम्ही तुमच्या निर्णयामुळे आनंदी आहोत.

    विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, आजूबाजूला पालक असतील तर त्यांनाही दाखवा. जेव्हा एका मुलीचे पालक आले तेव्हा मोदींनी विचारले की मुलगी परीक्षेतून मुक्त झाली आहे, तर तिला आता कसे वाटते? उत्तर मिळालं- ही फार कठीण वेळ आहे आणि आता त्यांना संधी मिळाली आहे, मग ते त्यांच्या करिअरसाठी तयारी करू शकतात. मोदी म्हणाले की, हेल्थ इज वेल्थ. सिर सलामत तर पगडी आहे.

    PM Modi Joined A Session With CBSE Students Organized By The Education Ministry today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!