• Download App
    Vande Bharat Express : केरळच्या पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा! PM Modi Flag off Keralas first Vande Bharat Express

    Vande Bharat Express : केरळच्या पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा!

    तिरुवनंतपुरममध्ये मोदींनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले.

    विशेष प्रतिनिधी

    तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी आज (25 एप्रिल) सकाळी 11:10 वाजता तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरून तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान राज्यातील पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. PM Modi Flag off Keralas first Vande Bharat Express

    पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन 11 जिल्ह्यांमध्ये धावणार आहे. यामध्ये तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड यांचा समावेश आहे.

    तिरुवनंतपुरममध्ये केला रोड शो  –

    पंतप्रधान मोदी आज सकाळीच तिरुवनंतपुरमला पोहोचले होते. येथे पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात आले. येथे पोहोचल्यावर त्यांनी रोड शो करून लोकांना शुभेच्छाही दिल्या. यानंतर ते मध्य रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले.

    वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी केली. तसेच तिरुवनंतपुरममध्ये त्यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले.

    पंतप्रधान मोदींनी मुलांशी साधला संवाद –

    रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 1 वरून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखविण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्रेनच्या एका डब्यात शाळकरी मुलांशी संवाद साधला. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हेही पंतप्रधानांसोबत उपस्थित होते. यावेळी मुलांनी मोदींना वंदे भारत ट्रेनचे स्वतःचे पेंटिंग आणि स्केचेस दाखवले.

    PM Modi Flag off Keralas first Vande Bharat Express

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत

    SC Examines : जज कॅश प्रकरण, सुप्रीम कोर्टाने म्हटले- संसदीय चौकशी पॅनेलमध्ये त्रुटी; आधी याची गांभीर्यता ठरवू, मग निर्णय

    India GDP Growth : भारताची GDP वाढ 7.4% राहण्याचा अंदाज; आर्थिक वर्ष 2025-26 साठी पहिला आगाऊ अंदाज जारी