• Download App
    pm modi directly targets nehru - gandhi family in rajya sabha

    भारत एका परिवाराची जहागिरी नाही, लोकसभेपेक्षा राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा रुद्रावतार, नेहरू – गांधी परिवारावर तिखट वार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज राज्यसभेत कालच्या लोकसभेपेक्षा जबरदस्त रुद्रावतार दिसला. त्यांनी थेट नेहरू – गांधी परिवारावर तिखट वार केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसचे, नेहरू – गांधी परिवाराचे अक्षरशः वाभाडे काढले. आम्ही कोणत्याही योजनेचे नामकरण नेहरू – गांधी परिवारापेक्षा वेगळे ठेवले, तर आक्षेप घेता. पण नेहरू – गांधी परिवाराच्या नावाने देशातल्या ६०० योजना आहेत. तर एखाद – दुसऱ्या योजनेला इतरांची नावे दिली, तर काय बिघडले, असा सवाल मोदींनी केला. pm modi directly targets nehru – gandhi family in rajya sabha

    इतकेच नाही, तर ज्या जवाहरलाल नेहरूंचे नाव आम्ही एखाद – दुसऱ्या कार्यक्रमात घेतले नाही, तर काँग्रेसवाले ओरडत राहतात, त्यांच्याच पिढीतल्यांना नेहरू नावाची का एलर्जी आहे. ते नेहरू नाव का लावत नाहीत, असा तिखट सवाल करून मोदींनी थेट नेहरू – गांधी परिवाराला टार्गेट केले. हा देश १४० कोटी जनतेच्या मेहनतीवर चालतो. तो कोणा एका परिवाराची जहागिरी नाही, असा इशाराही मोदींनी काँग्रेसला दिला.

    मोदींच्या भाषणात काँग्रेस सदस्यांनी अखंड घोषणबाजीतून अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. तरीही मोदींनी आपले भाषण नुसते सुरूच ठेवले असे नाही, तर त्यात काँग्रेसचे वाभाडे देखील काढले.

    काँग्रेसने देशात ६० पेक्षा अधिक वेळा ३५६ कलमाचा गैरवापर करून विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. ज्यांची सरकारे काँग्रेसने बरखास्त केली, ते करूणानिधींचे वारसदार, एनटीआरचे वारसदार, कम्युनिस्ट अगदी शरद पवार पण त्याच काँग्रेससोबत बसले आहेत, असा जबरदस्त टोला पंतप्रधान मोदींनी लगावला. एकप्रकारे मोदींनी यातून विरोधकांच्या एकजुटीवर तिखट प्रहार केला.

    मोदींनी कालच्या भाषणात राहुल गांधींचे नावही घेतले नव्हते. त्यामुळे राहुल गांधींनी त्यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली होती. आज राज्यसभेत मोदींनी त्याची वेगळ्या प्रकारे परतफेड करून घेतली. मोदींनी काँग्रेसचा कच्चा चिठ्ठा खोलला. नेताजी सुभाषचंद्र बोस, परमवीर चक्र विजेते यांच्या नावांचा अंदमानसंदर्भात आवर्जून उल्लेख केला. तेव्हा सत्ताधारी बाकांवरून मोदींना बाके वाजवून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

    ईडीने विरोधकांना एकत्र आणले आहे, असा टोला मोदींनी काल लोकसभेत लगावला होता, तर आज राज्यसभेत त्यांनी काँग्रेसने बाकीच्या विरोधी पक्षांची राज्य सरकारे कशी बरखास्त केली होती, याचा पाढा वाचून विरोधकांमधली एकजूट किती तकलादू आहे, याचा आरसा दाखविला.

    pm modi directly targets nehru – gandhi family in rajya sabha

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!