• Download App
    पंतप्रधान मोदींच्या काकूंचे कोरोनाने निधन, अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात सुरू होते उपचार । PM Modi Aunt Dies During Covid 19 Treatment in Ahemadabad Civil Hospital today

    पंतप्रधान मोदींच्या काकूंचे कोरोनाने निधन, अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

    PM Modi Aunt Dies : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचे मंगळवारी निधन झाले. 80 वर्षे वय असलेल्या नर्मदाबेन यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. PM Modi Aunt Dies During Covid 19 Treatment in Ahemadabad Civil Hospital today


    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचे मंगळवारी निधन झाले. 80 वर्षे वय असलेल्या नर्मदाबेन यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

    पंतप्रधान मोदींचे बंधू प्रह्लाद मोदी म्हणाले की, 10 दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने नर्मदाबेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पती जगजीवनदास यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे. नर्मदाबेन यांचे कुटुंबीय अहमदाबादच्या रानिपमध्ये राहते.

    दरम्यान, गुजरातेतही कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात सोमवारी 14,340 जण कोरोनाबाधित आढळले. तर 7727 जण बरे होऊन घरी गेले. याच काळात 158 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 10 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. यापैकी 3 लाख 82 हजार बरे झालेले आहेत. तर 6,486 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,21,461 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे चिंता वाढली आहे.

    PM Modi Aunt Dies During Covid 19 Treatment in Ahemadabad Civil Hospital today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू