PM Modi : उत्तराखंडमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि तसेच अनेक साधूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे हरिद्वार कुंभमेळा वेळेआधीच समारोप करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतांशी बोलून हे सूचित केले आहे. कोरोना संकटामुळे कुंभ आता प्रतीकात्मक ठेवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतांना केले आहे. त्यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सर्व संतांच्या प्रकृतीबद्दल विचारपूसही केली. त्याचबरोबर त्यांनी संतांना आवाहन केले की, कोरोना संकटामुळे आता कुंभला प्रतीकात्मक ठेवावे. PM Modi’s appeal to saints to keep Kumbha as symbolic
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि तसेच अनेक साधूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे हरिद्वार कुंभमेळा वेळेआधीच समारोप करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतांशी बोलून हे सूचित केले आहे. कोरोना संकटामुळे कुंभ आता प्रतीकात्मक ठेवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतांना केले आहे. त्यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सर्व संतांच्या प्रकृतीबद्दल विचारपूसही केली. त्याचबरोबर त्यांनी संतांना आवाहन केले की, कोरोना संकटामुळे आता कुंभला प्रतीकात्मक ठेवावे.
पंतप्रधान मोदींनी शनिवारी सकाळी ट्विट केले की, ‘आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी आज फोनवर बोलले. सर्व संतांच्या आरोग्याबद्दल माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य देत आहेत. मी यासाठी संत जगताचे आभार मानतो.’ ते पुढे म्हणाले, ‘दोन शाही स्नान झाले आहेत, कोरोनाच्या संकटामुळे आता कुंभला प्रतीकात्मक ठेवले पाहिजे, अशी विनंती मी केली आहे. यामुळे या संकटाविरुद्धच्या लढ्याला बळ येईल.’
पंतप्रधान मोदींचे ट्विट शेअर करताना जुना आखाडाचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी ट्विट केले की, ‘आम्ही आदरणीय पंतप्रधानांच्या आवाहनाचा सन्मान करतो! जीवनाचे रक्षण करणे हे एक उत्तम पुण्य आहे. माझे धर्मपरायण जनतेला आवाहन आहे की, कोरोनाच्या परिस्थितीत मोठ्या संख्येने स्नान करण्यास येऊ नये. नियम पाळावे.’
सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या समारोपाची घोषणा करू शकते. कुंभचा कालावधी सरकारने 1 ते 30 एप्रिलदरम्यान केला आहे. कोरोनामुळेच निरंजनी आखाड्याने हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यासंदर्भात 17 एप्रिल रोजी कुंभमेळा संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री तीरथसिंग रावत शुक्रवारी यांनी येथील आतापर्यंतच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार होते, परंतु बैठक झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावली आहे. मागच्या काही दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण जसजसे वाढले आहे, त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. विशेषत: देहरादूनमध्ये वाढती रुग्णसंख्या काळजीत टाकणारी आहे. दिल्ली, यूपीसह काही राज्यांमध्ये करण्यात येत असलेल्या तरतुदी लक्षात घेऊन हा अहवाल तयार केला जात आहे. उद्या हा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येणार आहे.
PM Modi’s appeal to saints to keep Kumbha as symbolic
महत्त्वाच्या बातम्या
- Who Is Priti Patel : कोण आहेत ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल? यांच्याच मंजुरीनंतर फरार नीरव मोदीची होतेय ‘घरवापसी’
- जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!’, कवितेतून केली उद्धव ठाकरेंची पाठराखण
- Maharashtra Curfew 2021 : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संचारबंदीचे नियम पाळले नाही, तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही!
- The Lancet Report : हवेतून का पसरतोय कोरोना?, सविस्तर वाचा ‘द लान्सेट’च्या अहवालातील 10 ठळक मुद्दे
- WB Election 2021 Phase 5 Poll : बंगालमध्ये आज 5व्या टप्प्यातील मतदान, 45 जागांवर 342 उमेदवारांची अग्निपरीक्षा