• Download App
    आता दूर होईल ऑक्सिजनचा तुटवडा, देशभरात ५५१ PSA Oxygen Plants ची पंतप्रधान मोदींची घोषणा । PM Modi announces 551 PSA oxygen plants across the country through PM Cares

    India Fights Back : आता दूर होईल ऑक्सिजनचा तुटवडा; PMCARES मधून देशभरात आणखी ५५१ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार

    PSA oxygen plants : देशात ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी आज पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फंडमधून पीएम मोदींनी संपूर्ण देशात 551 PSA मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लांट लावण्याची घोषणा केली आहे. हे प्लांट सार्वजनिक रुग्णालयांत उभारले जातील. पीएम मोदी म्हणाले की, हे प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित होतील. PM Modi announces 551 PSA oxygen plants across the country through PM Cares


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी आज पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फंडमधून पीएम मोदींनी संपूर्ण देशात 551 PSA मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लांट लावण्याची घोषणा केली आहे. हे प्लांट सार्वजनिक रुग्णालयांत उभारले जातील. पीएम मोदी म्हणाले की, हे प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित होतील.

    या प्लांट्सच्या संचालनानंतर जिल्हास्तरावर ऑक्सिजनची समस्या कायमची संपुष्टात येईल. भारतात एकूण 718 जिल्हे आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जुलै 2018 च्या रिपोर्टनुसार, संपूर्ण देशात 1003 जिल्हा रुग्णालये आहेत. या हिशेबाने दोन जिल्हा रुग्णालयांवर एक ऑक्सिजन प्लांट उभारला जाईल. यामुळे कठीण काळातही ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर परिणाम होणार नाही.

    162 मेडिकल प्लांट आधीच कार्यान्वित

    हे ऑक्सिजन प्लांट राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या जिल्हा रुग्णालयांत उभारले जातील. प्लांट उभारल्यानंतर इक्विपमेंट्सची खरेदी आरोग्य मंत्रालयातर्फे केल जाईल. यापूर्वीही या फंडमधून 201.58 कोटी रुपयांच्या मदतीने 162 डेडिकेटेड मेडिकल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेले आहेत. हे प्लांटही देशातील सरकारी रुग्णालयांत उभारण्यात आलेले आहेत.

    PSA ऑक्सिजन प्लांट म्हणजे काय?

    PSA प्लांट लिक्विड मेडिकल ऑक्सिजन बॅकअपसाठी असतो. PSA प्लांट 4 आठवड्यात उभारता येतो. एका आठवड्यात कार्यान्वित होतो. याची किंमत 40 ते 50 लाख रुपयांच्या जवळ आहे. PSA प्लांट बहुतांश रुग्णालयांत नाही. या प्लांटचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्लांट गॅसला गॅसमध्येच रूपांतरित करू शकतो. हवेतून ऑक्सिजन घेऊन थेट रुग्णालयांत पोहोचवतो. दुसरीकडे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) मोठ्या प्लांटमध्ये कूलिंग मेथडने तयार होतो. यात आधी गॅसला लिक्विडमध्ये बदलले जाते. यानंतर क्रायो टँकरच्या मदतीने रुग्णालयांच्या टँकमध्ये फीलिंग केली जाते.

    PM Modi announces 551 PSA oxygen plants across the country through PM Cares

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली