भारत आणि ऑस्ट्रेलिया आपल्या मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहेत.
प्रतिनिधी
India-Australia Friendship : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना एक सुंदर पेंटिंग सादर केले आहे, जे अगदी फोटो फ्रेमसारखे दिसते. पण हे पेंटिंग खूप खास आहे. नीट पाहिल्यास त्यात छोटी छायाचित्रे दिसतील. PM Modi and Anthony Albanese gifted collages fashioned by images of Indian, Australian cricketers
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२३ चा चौथा आणि शेवटचा सामना खेळत आहेत. दोन्ही देशांसाठी हा एक खास प्रसंग आहे कारण दोन्ही देश आपल्या मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. या खास प्रसंगी दोन्ही देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते. याप्रसंगी बीसीसीआय कडून या दोघांनाही विशेष भेट देण्यात आली.
मागील ७५ वर्षांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंच्या फोटोंचा कोलाज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज या दोघांना सामना सुरु होण्याअगोर भेट म्हणून बीसीसीआय कडून देण्यात आला. या सुंदर कोलामधून दोन्ही पंतप्रधानांच्या प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत. शिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ७५ वर्षांच्या मैत्रीचेही हे एक प्रकारे प्रतिक मानले जात आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना ही सुंदर पेंटींग भेट दिली. तर, बीसीसीआयचे सचिव जयेश शहा यांनी पंतप्रधान मोदी यांना ही भेट दिली.
या खास प्रसंगी दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी सामन्यापूर्वी आपापल्या संघाच्या कर्णधाराला खास कॅप दिली. यानंतर, जेव्हा सामन्यापूर्वी नाणेफेक झाली तेव्हा पीएम मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज यांनी खास रथावर स्वार होऊन मैदानात फिरले आणि येथे आलेल्या प्रेक्षकांचे स्वागत केले.
PM Modi and Anthony Albanese gifted collages fashioned by images of Indian Australian cricketers
महत्वाच्या बातम्या
- स्वयंघोषित काँग्रेस युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या!, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
- “देशाचा अपमान मान्य नाही..”: राहुल गांधींच्या माईक बंद करण्याच्या वक्तव्यावर उपराष्ट्रपती संतापले
- ओवैसींना बी टीम म्हणून हिणवताना पवारच बनलेत का भाजपची बी टीम??
- रामचंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती; १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत झाले आहेत पराभूत