• Download App
    PM Kisan Samman Nidhi Yojana: या दिवशी तुमच्या खात्यात जमा होईल 10 वा हप्ता : आत्ताच करा नोंदणी। PM Kisan Samman Nidhi Yojana: On this day your account will be credited 10th installment: Register now

    PM Kisan Samman Nidhi Yojana: या दिवशी तुमच्या खात्यात जमा होईल 10 वा हप्ता : आत्ताच करा नोंदणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM KISAN scheme) पुढील हप्ता म्हणजेच 10वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तुम्ही शेतकरी असाल आणि अजून या योजनेत नोंदणी केली नसेल तर आत्ताच करा नोंदणी…PM Kisan Samman Nidhi Yojana: On this day your account will be credited 10th installment: Register now

    देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लवकरच सरकारकडून चांगली बातमी मिळणार आहे. सरकार पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता लवकरच जारी करू शकते, असे वृत्त समोर आले आहे. यासाठी तुम्ही नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेत तुमची नोंदणी केली असेल तर 10वा हप्ता तुमच्या खात्यावर लवकरच जमा होऊ शकतो. असे वृत्त आहे की केंद्र सरकार 15 डिसेंबरच्या आसपास पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करू शकते.



    सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत सुमारे 1.58 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला अजून या योजनेचा लाभ मिळाला नसेल, तर लगेच या योजनेसाठी स्वतःची नोंदणी करा.

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 टप्प्यात 2000 रुपयांप्रमाणे दिली जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो.

    अशी करा नोंदणी

    नोंदणीसाठी प्रथम तुम्हाला पीएम किसान httpspmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे नवीन नोंदणीचा ​​पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता एक नवीन पान उघडेल. नव्या पानावर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा, त्यानंतर नोंदणी फॉर्म उघडेल. नोंदणी फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती द्यावी लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही कोणत्या राज्यातील आहात, कोणत्या जिल्ह्यातील, ब्लॉक किंवा गावाची माहिती द्यावी लागेल. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचे नाव, लिंग, वर्गवारी, आधार कार्ड माहिती, बँक खाते क्रमांक ज्यामध्ये पैसे हस्तांतरित केले जातील, त्या बँकेच्या शाखेचा आयएफएससी कोड, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.

    तसेच सर्व माहिती द्यावी लागेल जसे सर्वेक्षण किंवा खाते क्रमांक, खसरा क्रमांक, किती जमीन आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर ती जतन करावी लागेल.सर्व माहिती दिल्यानंतर नोंदणीसाठी फॉर्म जतन करावा लागेल. ही सर्व माहिती भविष्यात जाणून घेण्यासाठी आपण फॉर्म जतन करू शकता.

    PM Kisan Samman Nidhi Yojana : On this day your account will be credited 10th installment: Register now

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक