आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता 10.09 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला. पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,946 कोटी रुपये ट्रान्सफर केले. कार्यक्रमादरम्यान पीएम मोदींनी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) शी संबंधित लोकांशी संवादही साधला. PM Kisan 10th installment released PM Modi transfers Rs Rs 20,946 crore to 10.09 crore farmers accounts, check Status
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता 10.09 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला. पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,946 कोटी रुपये ट्रान्सफर केले. कार्यक्रमादरम्यान पीएम मोदींनी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) शी संबंधित लोकांशी संवादही साधला.
यासोबतच पीएम मोदींनी सुमारे 351 शेतकरी उत्पादक संस्थांना 14 कोटींहून अधिक इक्विटी अनुदान जारी केले, याचा फायदा 1.24 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होईल. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.
किसान सन्मान निधी अंतर्गत, सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित करते. योजनेअंतर्गत, पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर-मार्च दरम्यान जारी केला जातो.
हप्त्याची स्थिती कशी तपासायची?
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in.
होम पेजवर, शेतकरी कॉर्नरमधील लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
येथे आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाका.
Get Data वर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती समोर येईल.
यामध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती पाहू शकता.
मोबाईलवर असे तपासा
तुम्ही तुमच्या मोबाईलवर हप्त्याची स्थितीदेखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम पीएम किसान मोबाईल अॅप डाउनलोड करावे लागेल. अॅपद्वारे तुम्ही नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करू शकता. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. सबमिट केलेल्या माहितीमध्ये तुम्ही कोणत्याही सुधारणा करू शकता. तुम्ही लाभार्थी यादीत तुमची स्थिती तपासू शकता. तुम्ही तुमचा व्यवहार क्रमांक तपासू शकता. याशिवाय इतरही अनेक सुविधा आहेत.
PM Kisan 10th installment released PM Modi transfers Rs Rs 20,946 crore to 10.09 crore farmers accounts, check Status
महत्त्वाच्या बातम्या
- Recruitment 2022 : CISF मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 249 जागा, 12वी पासही करू शकतात अर्ज
- मोठी बातमी : महाराष्ट्रात निर्बंध वाढणार! 10 मंत्री आणि 20 हून अधिक आमदार कोविड पॉझिटिव्ह, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
- वैष्णोदेवी मंदिरात का झाली चेंगराचेंगरी?, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि डीजीपींनी सांगितले दुर्घटनेचे कारण