प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेमुळे बराच वाद निर्माण झाला. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका देखील दाखल झाली आहे. Planning of police action and preparation to impose legal
त्यापलिकडे जाऊन राज ठाकरे यांचे निवासस्थान “शिवतीर्थ” याचे काही बेकायदा बांधकाम आहे का?, या विषयी मुंबई महापालिका बारकाईने तपास करणार आहे. एकूण राज ठाकरे यांच्या मागे कायदेशीर ससेमिरा लावण्याची तयारी ठाकरे – पवार सरकारने केली आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणाचा पोलिसांनी आढावा घेत बारकाईने अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. आता त्यानुसार राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई काय करायची, यावर आता विचारविनिमय सुरू झाला आहे.
राज ठाकरेंकडून १२ अटींचे उल्लंघन
राज ठाकरे यांच्या सभेसाठी १६ अटी लावल्या होत्या. त्यातील १२ अटींचे उल्लंघन करण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी राज ठाकरे यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच पोलिसांनी यासंबंधी पुरावे गोळा केले आहेत. लवकरच साक्षीदारांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे. भाषणातून राज ठाकरे यांनी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सभा स्थळाच्या पंचनामा
या गुन्ह्यांप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरी यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सभा स्थळाचा पंचनामा केला आहे. सभेतल्या भाषणाचे पुरावे पोलिसांनी जमा केले आहेत. राज ठाकरे यांना या प्रकरणी लगेच नोटीस द्यायची का, नंतर द्यायची हा तपासी अधिकाऱ्याचा तपासावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Planning of police action and preparation to impose legal
महत्वाच्या बातम्या