विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : सार्वजनिक, खासगी तसेच माहिती – तंत्रज्ञानाच्या ठिकाणी महिलांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी केरळ सरकारने सर्वसमावेशक ‘पिंक प्रोटेक्शन’ उपक्रमाची घोषणा केली. त्याचप्रमाणे, केरळमधील सर्व १४ जिल्ह्यांत नियंत्रण कक्षाची स्थापनाही केली आहे. ‘पिंक रोमिओ’ या महिला पथकाची सरकारने यापूर्वीच स्थापना केली आहे. Pink protection started in Kerala
महिलांचा हुंड्याशी संबंधित छळ, सायबर बुलिंग तसेच सार्वजनिक ठिकाणावरील अत्याचार रोखण्यासाठी ‘पिंक प्रोटेक्शन’ हा उपक्रम केरळ सरकारने हाती घेतला आहे. या नव्या उपक्रमांतर्गत सध्याची गस्तीची प्रणालीही मजबूत केली जाईल.
पोलिस अधिकाऱ्यांना महिला संरक्षणासाठी दहा मोटारी, ४० दुचाकी आणि २० सायकली राज्य सरकारने दिल्या आहेत. ‘पिंक प्रोटेक्शन’ अंतर्गत गुलाबी वेशातील ‘जनमैत्री’ या विशेष पोलिस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक प्रत्यक्ष घरी जाऊन कौटुंबिक हिंसाचाराची माहिती घेईल. त्याचप्रमाणे, पथक पंचायत सदस्य आणि स्थानिकांकडूनही याबाबत माहिती घेईल. त्यानंतर, पथकाकडून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल. पथकातील प्रशिक्षित अधिकारी सार्वजनिक ठिकाणी हजर राहून समाजकंटकांवर लक्ष ठेवतील.
Pink protection started in Kerala
महत्त्वाच्या बातम्या
- भारताला मिळणार ‘मॉडर्ना’चे ७५ लाख डोस, लस कधी येणार याची शाश्वती नाही
- पद मिळताच सिद्धू यांना आंदोलक शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे
- आयआयटीच्या तरुणांकडून ऑक्सिजन वाचवण्यासाठी भन्नाट शक्कल, नव्या उपकरणामुळे प्राणवायूची मोठी बचत
- देश हर्ड इम्युनिटीच्या उंबरठ्यावर, संसर्गाची तिसरी लाट तीव्र नसण्याचा शास्त्रज्ञांचा होरा