• Download App
    अभिमानास्पद : कॅप्टन जोया अग्रवाल संयुक्त राष्ट्रसंघात महिला प्रवक्तेपदी, जनरेशन इक्वॅलिटी अंतर्गत सोपवण्यात आली जबाबदारी|Pilot Captain Joy Agarwal appointed as woman spokesmanin United Nations

    अभिमानास्पद : कॅप्टन जोया अग्रवाल संयुक्त राष्ट्रसंघात महिला प्रवक्तेपदी, जनरेशन इक्वॅलिटी अंतर्गत सोपवण्यात आली जबाबदारी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एअर इंडियाच्या पायलट कॅप्टन जोया अग्रवाल यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जनरेशन इक्वॅलिटी अंतर्गत ही जबाबदारी जोयावर सोपवण्यात आली आहे.Pilot Captain Joy Agarwal appointed as woman spokesmanin United Nations

    जोया म्हणाल्या की, यूएन वुमेनसारख्या व्यासपीठावर देशाचे आणि एअर इंडियाचे ध्वजवाहक म्हणून प्रतिनिधित्व करणे ही एक मोठी संधी आहे. भारताचा नावलौकिक करण्याचा त्यांना सन्मान मिळत आहे. त्यांनी भारत सरकार आणि एअर इंडियाचे आभार मानले.



    त्याचबरोबर जोया असेही म्हणाल्या की, त्या भारत सरकारच्या आभारी आहेत. त्यामुळे त्यांना या गणवेशात देशसेवेची संधी मिळाली. तसेच संयुक्त राष्ट्र महिला ग्लोबल फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि येथे पोहोचण्याची परवानगी दिल्याबद्दल एअर इंडियाची आभारी आहे.

    जोया या आईवडिलांचे एकुलत्या एक कन्यारत्न आहेत. जोया यांनी वयाच्या 8 व्या वर्षी आकाशात उडण्याचे स्वप्न पाहिले. सध्या त्या एअर इंडियाच्या कमांडर आहेत आणि जगभरात बोईंग 777 विमान उडवत आहेत.

    Pilot Captain Joy Agarwal appointed as woman spokesmanin United Nations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!