• Download App
    Corona Vaccine : अमेरिकन फायझरची लस 12 वर्षांवरील सर्वच व्यक्तींवर प्रभावी; केंद्राला कंपनीकडून माहिती।Pfizer vaccine is also Effective on 12 above 12 years persons

    Corona Vaccine : अमेरिकन फायझरची लस 12 वर्षांवरील सर्वच व्यक्तींवर प्रभावी; केंद्राला कंपनीकडून माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : फायझरची लस 12 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांसाठी उपयुक्त आहे. या लसीला एका महिन्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवता येते. भारतात आढळणार्‍या कोरोनासाठी बरीच प्रभावी आहे, अशी माहिती कंपनीने केंद्र सरकारला दिली आहे. Pfizer vaccine is also Effective on 12 above 12 years persons

    अमेरिकन कंपनी फायझरने (Pfizer) आपल्या कोरोना लसीच्या परिणामकारकतेची, चाचणीची संपूर्ण माहिती भारताला दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इतर देशांनीही या लसीला दिलेल्या मंजुरीबाबत संपूर्ण माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.



    फायझरने अमेरिकेसह 116 देशांशी लस पुरवठ्यासाठी करार केला आहे. आतापर्यंत जगभरात फायझर लसींचे 14.7 कोटी डोस दिले आहेत.

    सध्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस नागरिकांना दिली जात आहे. सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीलाही मान्यता दिली. मात्र, ही लस सर्वसामान्यांनी दिली जात नाही. देशात कोरोना लसींचे 20 कोटींहून अधिक डोस पुरविले आहेत.

    Pfizer vaccine is also Effective on 12 above 12 years persons

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!